Full Width(True/False)

डिप्रेशनमुळं आशुतोष भाकरेची आत्महत्या; सुरू होते उपचार

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं डिप्रेशनमुळं आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर मराठी सिनेसृष्टीला आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनं मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आणि अभिनेत्री हिचा पती आशुतोष याच्या आत्महत्येनंतर त्यानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर पोलिस शोधत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष देखील डिप्रेशनमध्ये होता. गेल्या वर्षभरापासून आशुतोषला हवं तसं काम मिळत नव्हतं. त्यामुळं तो तणावात होता. त्याच्या डिप्रेशनसंदर्भात समजल्यानंतर घरच्यांनी त्याला आधार देत मुंबईतील दादर इथल्या मानसोपचार तज्ज्ञांकडं उपचार सुरू केले होते. आशुतोष उपचारांना चांगला प्रतिसाद देखील देत होता. असं असताना आशुतोषनं टोकाचं पाऊल उचललं आणि जीवन संपवलं. या घटनमुळं त्याच्या कटुंबिय आणि चाहच्यांना मोठा धक्का बसला आहे. लॉकडाऊन सुरू असल्यानं आशुतोष आणि मयुरी त्याच्या नांदेड इथल्या घरी राहत होते. मयुरी आणि आशुतोषमध्ये काही मतभेद नव्हे; असं त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनं सांगितलं असून आशुतोषच्या आत्महत्येचा पोलिस सध्या तपास करत आहेत. २० जानेवारी २०१६ रोजी मयुरी आणि आशुतोष विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्तानं मुयरीनं एक सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तर एका मुलाखतीदरम्यानं मयुरीनं तिची आणि आशुतोषची लव्हस्टोरी देखील सांगितली होती. आशुतोषनं ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं होतं तर खुलता कळी खुलेना मालिकेतून मयुरी घरोघरी पोहोचली. त्यानंतर तिनं व्यावसायिक नाटकांमध्येही काम केलं. गेल्या वर्षी 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात असतना सोशल मीडियावर मयुरीचं नाव चर्चेत आलं होतं. परंतु, खुद्द मयुरीनं या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केलं होतं. ' मध्ये सहभागी होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला गेला होता हे खरं आहे. परंतु, मी शोमध्ये सहभागी होणार नाहीए. मला वाटते मी या शोसाठी योग्य व्यक्ती नाही. मला माझं खासगी आयुष्य शांतपणे जगायला आवडतं. माझ्या खासगी आयुष्यातील गोष्टी मी लोकांशी शेअर करत नाही. शिवाय, बिग बॉसच्या तारखा आणि माझ्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा सारख्याच असल्यानं मला होकार देणं शक्य नव्हतं.' असं ती म्हणाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39L6e0o