नवी दिल्लीः भारती एअरटेलने आपला ९९ रुपये, १२९ रुपये आणि १९९ रुपयांचे तीन प्लान्स आता अन्य शहरात सुद्धा उपलब्ध करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. हे सर्व प्लान्स आधी काही निवडक सर्कलमध्ये उपलब्ध होते. एअरटेलचा ९९ रुपयांचाा प्लाना आता बिहार, झारखंड आणि ओडिशामध्येही उपलब्ध होणार आहे. याआधी हा प्लान केवळ कोलकाता, पश्चिम बंगाल, राजस्थान यूपी ईस्ट, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उपलब्ध होता. कंपनीने १२९ रुपये आणि १९९ रुपयांचा प्लान आता दिल्ली एनसीआर, आसाम, बिहार, झारखंड, मुंबई, नॉर्थ ईस्ट आणि ओडिशात उपलब्ध होणार आहे. वाचाः वाचाः या राज्यात हे प्लान उपलब्ध होणार नाही एअरटेलचे हे प्लान आंध्र प्रदेश, तेलंगाना, चेन्नई, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडू या सर्कलमध्ये सध्या हे प्लान लागू करण्यात येणार नाहीत. Only Tech ने आपल्या रिपोर्टमधून ही माहिती दिली आहे. एअरटेलचा ९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या ९९ रुपयांच्या प्लानमध्ये १ जीबी डेटा, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग कोणत्याही नेटवर्कवर मिळते. तसेच या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस युजर्संना दिले जाते. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना Airtel Xstream, Wynk Music, आणि Zee5 Premium चे फ्री अॅक्सेस मिळतो. वाचाः १२९ रुपयांच्या प्लानमधील बेनेफिट्स एअरटेलच्या १२९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ३०० एसएमएस मिळतात. तसेच युजर्संना ९९ रुपयांच्या प्लानसारखेच बेनेफिट्स मिळते, ज्यात १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश आहे. १९९ रुपयांचा प्लान एअरटेल आपल्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा म्हणजेच एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस फ्री हेलो ट्यून्स आणि Airtel Xstream, Wynk Music, आणि Zee5 Premium चे फ्री अॅक्सेस या प्लानमध्ये दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38FH0Qo