Full Width(True/False)

Flipkart Laptop Bonanza Sale: लॅपटॉप स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ३३ टक्क्यांपर्यंत मोठी सूट

नवी दिल्लीः : नवीन लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ई कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ९ मार्च पासून लॅपटॉप बोनांजा सेल सुरू करण्यात आला आहे. तीन दिवस चालणारा हा सेल ११ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये खूप साऱ्या लॅपटॉप मॉडल्सला स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. lenovo Ideapad 3 Core i5 10th Gen 15IIL05 Laptop या lenovo Laptop लॅपटॉपमध्ये ग्राहकांना ८ जीबी रॅम, १ टीबी हार्ड डिस्क ड्राइव्ह, विंडोज १० होमसोबत १५.६ इंचाची स्क्रीन मिळणार आहे. या लॅपटॉपचे वजन १.८५ किलोग्रॅम आहे. हा लॅपटॉप फुल एचडी एलईडी बॅकलिट अँटी ग्लेयर डिस्प्ले सोबत येतो. या लॅपटॉपमध्ये १० वे जनरेशन इंटेल कोर आय ५ प्रोसेसर दिले आहे. या लॅपटॉप मॉडलवर ३२ टक्के सूट मिळत आहे. डिस्काउंटनंतर लॅपटॉपला ४२ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. या लॅपटॉपची खरी किंमत ६३ हजार ७९० रुपये आहे. याचाच अर्थ २० हजार ८० रुपयांची बचत करता येऊ शकते. वाचाः Nokia PureBook X14 Core i5 10th Gen NKi510UL85S Laptop या नोकियाच्या लॅपटॉपमध्ये डॉल्बी व्हिजन सोबत १४ इंचाचा फुल एचडी एलईडी बॅकलिट आयपीएस डिस्प्ले आहे. लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम, ५१२ जीबी एसएसडी आणि विंडोज १० होम सपोर्ट दिला आहे. या लॅपटॉपचे वजन १.१ किलोग्रॅम आहे. या लॅपटॉपमध्ये १० वे जनरेशनचे इंटेल कोर आय ५ प्रोसेसर दिले आहे. या लॅपटॉपवर ३३ टक्के सूट दिल्यानंतर ५९ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. याची एमआरपी किंमत ९० हजार रुपये आहे. वाचाः Acer Aspire 5 Core i5 11th Gen A514-54-50LC Laptop या लॅपटॉप मॉडल मध्ये कंपनीने १४ इंचाचा फुल एचडी एलईडी बॅकलिट आयपीएस डिस्प्ले दिला आहे. या लॅपटॉपचे वजन १.४५ किलोग्रॅम आहे लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम, ५१२ जीबी एसएसडी आणि विंडोज १० होमचे सपोर्ट मिळतो. याशिवाय, फास्ट सिस्टम अॅक्सेस साठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या लॅपटॉप मॉडल मध्ये ११ वे जनरेशनचे इंटेल कोर आय ५ प्रोसेसर दिले आहे. वाचाः या लॅपटॉपवर २४ टक्के सूट दिली जात आहे. डिस्काउंट नंतर या लॅपटॉपला ५२ हजार ९९० रुपये (एमआरपी किंमत ९,९९० रुपये) मध्ये खरेदी करू शकता. याशिवाय या सर्व लॅपटॉपमध्ये मॉडल्ससह खूप साऱ्या ऑफर्स सुद्धा ग्राहकांसाठी आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ojn287