Full Width(True/False)

रणबीर कपूरसारख्या दिसणाऱ्या जुनैद शाहचं निधन

श्रीनगर- हुबेहूब रणबीर कपूरसारखा दिसणाऱ्या जुनैद शाहचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो २८ वर्षांचा होता. राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. काश्मिरी पत्रकार यूसुफ जमील यांनी या घटनेबद्दल ट्वीट करत माहिती दिली. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की ते जुनैदच्या शेजारी राहत होते. जुनैद मॉडेलिंग करत होता आणि रणबीरसारखा दिसत असल्यामुळे फार प्रसिद्धही होता. पत्रकाराने केलं ट्वीट- यूसुफ जमील यांनी ट्वीट करत म्हटलं की, आमचे जुने शेजारी निसार अहमद शाह यांचा मुलगा जुनैद यांचं रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. लोक म्हणायचे की तो बॉलिवूड स्टार रणबीर कपूरसारखा दिसतो. मी म्हणतो की तो त्याच्या आजारी वडील, आई आणि पूर्ण काश्मीरसाठी आशा, सामर्थ्य आणि मोक्षप्रमाणे होता. कोणत्याही प्रकारचा हृदय रोग नव्हता त्यांनी अजून एक ट्वीट करत म्हटलं की, 'मला कळलं की २८ वर्षीय जुनैद आणि त्याचे आई- बाबा महिन्याभरापूर्वीच मुंबईहून परतले. तो तिथे मॉडेलिंग करत होता आणि असं म्हटलं जातं की अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्येही त्याने स्वतःचं नाव नोंदवलं होतं. त्याला हृदयाशी निगडीत कोणताही आजार नव्हता.' एवढंच नाही जेव्हा सोशल मीडियावर जुनैदचे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा ऋषी कपूर यांनाही काही सेकंद कळलं नव्हतं की नक्की यातला खरा रणबीर कोणता आहे ते...


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DMJSzn