मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन करोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आता अनुपम खेर यांच्या आईसह भाऊ आणि कुटुंबातील चार लोकांना करोनाची लागण झाली आहे. अनुपम खेर यांनी रविवारी सकाळी ट्वीट करून याची माहिती दिली. अनुपम यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, काही दिवसांपासून त्यांची आई दुलारीची तब्येत बिघडली होती. तिला भूक लागत नव्हती आणि ती झोपूनच रहायची. डॉक्टरांच्या सांगण्यावरून सुरुवातीला रक्ताची चाचणी घेण्यात आली. ज्यात सर्व काही ठीक दिसलं. नंतर सीटी स्कॅन केलं आणि त्यानंत पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. अनुपम खेर यांची टेस्ट निगेटिव्ह- यानंतर अनुपम आणि त्यांचे भाऊ राजू यांनी करोनाची टेस्ट केली. यात अनुपम यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर राजू यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर संपूर्ण कुटुंबाची करोना चाचणी करण्यात आली. यात अनुपम यांची वहिनी म्हणजे राजू यांची पत्नी आणि भाची वृंदाही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यात त्यांच्या भाच्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अनुपम यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, त्यांच्या आईला कोकिलाबेन इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. यासोबतच बीएमसीलाही यासंबंधीची सुचना देण्यात आली आहे. तसेच व्हिडिओमध्ये अनुपम यांनी आपल्या आई- वडिलांची काळजी घेण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. जर त्यांना भूक लागत नसेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका असंही ते म्हणाले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BSODXR