मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ हे बच्चन () करोना पॉझिटिव्ह ( ) आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण त्यांना यापूर्वीही काही मोठे आजार झाले होते. अमिताभ यांना यापूर्वी क्षयरोग (टीबी) झाला होता. तसंच त्यांचे निम्म्याहून अधिक यकृत निकामी झाले आहे. अमिताभ यांना यापूर्वी टीबी झाला होता 'कौन बनेगा कोरडपती' (KBC)च्या पहिल्या पर्वाच्या शूटिंगवेळी अमितभा बच्चन यांना टीबी झाला होता. याची माहिती स्वतः अमिताभ यांनी एका मुलाखतीत दिली होती. शोच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला टीबी झाला होता. यासाठी आपण जवळपास एक वर्ष उपचार घेत होतो. अमिताभ यांना मणक्यांचा टीबी झाला होता. यामुळे त्यांना फार वेळ बसलं जात नव्हतं. शूटिंग दरम्यान आपण ८ ते १० पेन किलर रोज घेत होतो. यामुळे आपण टीबीच्या आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा निश्चिय केला, असं अमिताभ यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं. कुलीच्या शूटिंगवेळी अपघात १९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या शूटिंगवेळी यांचा पोटात गंभीर दुखापत झाली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचे बरेच रक्त गेले. जवळपास २०० रक्तदात्यांनी त्यांना रक्त दिले होते. त्यापैकी ६० पिशव्या रक्त त्यांना दिले गेले. यातून ते वाचले. पण रक्तातून झालेल्या दुसऱ्या आजाराने त्यांना ग्रासले. रक्तदात्यांपैकी एकाल हॅपिटायटिस बी हा आजार होता. ते रक्त अमिताभ यांच्या शरीरात गेल्याने त्यांनाही हा आजार झाला. फक्त २५ टक्के लिव्हर कार्यरत ५० हून अधिक वर्षांच्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन हे बऱ्याचदा आजारी पडले. यामुळे त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करावं लागलं होतं. ७७ वर्षांचे असलेल्या अमिताभ बच्चन यांचे फक्त २५ टक्के लिव्हर सध्या काम करत आहे. हॅपेटायटिसच्या इन्फेक्शनमुळे त्यांचे ७५ टक्के लिव्हर हे निकामी झाले आहे. वर्ष २००० पर्यंत ते ठणठणीत होते. पण एका वैद्यकीय तपासणीत त्यांच्या लिव्हरला इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. यामुळे सध्या त्यांच लिव्हर फक्त २५ टक्के इतकच काम करतंय. पोटातील आतड्याही कमकुवत काही वर्षांपूर्वी अमिताभ यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २००५ मध्ये त्यांना पोटात प्रचंड दुखू लागलं होतं. त्यावेळी हा गॅस्ट्रोची समस्या आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला. पण नंतर सखोल तपासणी केल्यावर त्यांच्या आतड्या काही प्रमाणात कमकुवत झाल्याचं समोर आलं. या आजारात मोठे आणि छोटे आतडे कमकुवत होते आणि त्यांना सूज येते. अमिताभ यांना यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यांना दोन महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. अमिताभ यांना अस्थमाचाही आजार आहे. अमितभा हे कायम ब्लॉग आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची माहिती चाहत्यांना शेअर करत असतात. चाहत्यांचे प्रेम आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे आमितभा हे आतापर्यंत इतक्या आजारांचा सामना करत आले. अजूनही ते सतत काम करत असतात.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Zlkc5n