मुंबई- पश्चिम बंगालमधील बिजॉयगढ येथील २६ वर्षीय अभिनेत्री झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने स्वतः यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अभिनेत्रीची वैद्यकिय तपासणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी अभिनेत्रीच्या घरी तिच्याच ओळखीचा एक व्यक्ती आर्थिक मदत मागण्यासाठी आला. पोलिसांना दिलेल्या माहितीत अभिनेत्रीने ती घरात एकटी असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीला एकटं पाहून त्याने विनयभंग केला. एवढंच नाही तर त्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तसेच जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तो व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकीही दिली. मात्र त्याच्या धमकीला घाबरली नाही आणि तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेबद्दल माहिती देताना पोलिसांनी स्पष्ट केलं की, आरोपीविरोधात भारतीय दंडाधिकार कायद्यानुसार कलम ३७६/५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपी व्यावसायिक असून अभिनेत्रीच्या परिचयातील आहे. दोघांचं याआधी अफेअर असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री मूळची नादिया () येथील राहणारी आहे. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती कोलकत्यात आली. आरोपीसोबत अभिनेत्रीचे चांगलं संबंध होते. मात्र काही कारणांमुळे दोघांचे संबंध बिघडले. लॉकडाउनच्या काळात आरोपीने फेसबुकवरून अभिनेत्रीला संपर्क केला आणि भेटण्याची विनंती केली. सुरुवातीला अभिनेत्रीने भेटण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र आरोपीने व्यवसायात झालेलं नुकसान सांगितलं आणि आर्थिक मदत मागितली तेव्हा अभिनेत्रीने त्याला घरी बोलावलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ze2xMQ