Full Width(True/False)

हुवावेने भारतात लाँच केले FreeBuds 3i, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः हुवावेने अॅक्टिव नॉइज कँसलेशन (ANC) आणि यूनीक इन-ईयर डिजाइन सोबत भारतात लाँच केले आहेत. हुवावे ने FreeBuds 3i ला याच वर्षी ग्लोबली लाँच केले होते. हुवावेच्या इयरबड्स अॅक्टिव नॉइज कँसलेशन (ANC) साठी ट्रिपल माइक सेटअप सोबत आले आहेत. भारतात इयरफोन्सची किंमत ९ हजार ९९० रुपये आहे. इयरबड्स आपल्या अॅक्टिव नॉइज कँसलेशन फीचरने 32dB पर्यंत बॅकग्राउंड नॉइज रिडक्शन करीत असल्याचा कंपनीचा दावा आहे. वाचाः ऑफर अंतर्गत इयरबड्स सोबत हुवावेचा बँड ४ फ्री हुवावेचा इयरबड्स भारतात कार्बन ब्लॅक आणि सेरमिक व्हाईट कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. लाँच ऑफर अंतर्गत हुवावे आपला FreeBuds 3i सोबत कोणत्याही अतिरिक्त किंमतीसह ३०९९ रुपये किंमतीचा Huawei Band 4 देत आहे. हुवावे च्या माहितीनुसार, ही ऑफर ६ ते ७ ऑगस्ट पर्यंत अॅमेझॉनवर प्राईम मेंबर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. तर दुसऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही ऑफर १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हुवावेचा FreeBuds 3i अॅक्टिव नॉइज कँसलेशन सोबत येणारा सर्वात स्वस्त ट्रू वायरलेस इयरफोन्स पैकी एक आहेत. वाचाः ५.५ ग्रॅम हुवावेच्या इयरबड्सचे वजन हुवावेचा FreeBuds 3i लाइट-वेट डिजाइन सोबत येतो. इयरबड्चे वजन ५.५ ग्रॅम इतके आहे. तर चार्जिंगचे वजन ५१ ग्रॅम इतके आहे. इयरबड्स 10mm लार्ज डायनामिक ड्राइवर्स सोबत येतात. पॉवरफुल बेस डिलिवर करण्यात हे सक्षम असल्याचे कंपनीचे म्हणने आहे. हुवावेचे इयरबड्स थ्री टॉप टेक्नोलॉजी सोबत येतात. हुवावेचे FreeBuds 3i वॉटर-रेजिस्टेंट IPX4 टेक्नोलॉजी सोबत येतात. तसेच ३.५ तासांपर्यंत प्लेबॅक ऑफर करतात, असा कंपनीचा दावा आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2D6qehm