नवी दिल्लीः शाओमीने काही दिवसांपूर्वी भारतात नवीन पोको फोन लाँच केला आहे. आज पोको फोनचा पहिला सेल सुरू होणार आहे. हा सेल आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. Poco M2 Pro फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. फोनला १३ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केले जावू शकते. पोकोच्या फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील सेगमेंटमध्ये हा नवीन पोको फोन कंपनीसाठी गेमचेंजर होऊ शकतो. वाचाः Poco M2 Pro ची किंमत रॅम आणि स्टोरेजच्या आधारावर हा फोन 4GB+64GB, 6GB+64GB आणि 6GB+128GB मध्ये उपलब्ध आहे. या व्हेरियंट्सची किंमत १३ हजार ९९९ रुपये, १४ हजार ९९९ रुपये आणि १६ हजार ९९९ रुपये आहे. फोनला आज दुपारी १२ वाजेपासून खरेदी करता येवू शकते. वाचाः ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. कॅमेरा अॅपमध्ये प्रो कलर मोड, प्रो व्हिडिओ मोड आणि रॉ मोड दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा इन स्क्रीन फ्रंट कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेऱ्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात नाइट मोड सुद्धा देण्यात आला आहे. वाचाः Poco M2 Pro मध्ये हे जबरदस्त फीचर्स पोको Poco M2 Pro मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो फुल-HD+ रेजॉलूशन (1080x2400 पिक्सल) येतो. फोनला चांगले प्रोटेक्शन देण्यासाठी यात फ्रंट, रियर आणि कॅमेऱ्यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ दिला आहे. Android 10 वर काम करणाऱ्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे. फोन अनलॉक करण्यसााठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉक फीचर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32f4eeX