Full Width(True/False)

Saroj Khan- १३ व्या वर्षी ४३ वर्षांच्या डान्स मास्टरशी केलं होतं लग्न

मुंबई- प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शित यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडला अजून एक धक्का बसला आहे. २० जून रोजी त्यांना गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले होते. मात्र गुरुवारी रात्री गुरुवारी १ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांना मदर ऑफ डान्स या नावाने ओळखलं जायचं. सरोज यांनी आपल्यासाठी नृत्यदिग्दर्शन करावं अशी अनेक कलाकारांची इच्छा असायची. फार कमी लोकांना हे माहीत आहे की सरोज खान यांचं मूळ नाव निर्मला नागपाल आहे. सरोज यांच्या वडिलांचं नाव किशनचंद सद्धू सिंह आणि आईचं नाव नोनी सद्धू सिंह असं आहे. विभाजनानंतर सरोज यांचं कुटुंब पाकिस्तानातून भारतात आलं होतं. पैशांच्या कमतरतेमुळे फार कमी वयात सरोज यांनी कामाला सुरुवात केली होती. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांचा पहिला सिनेमा 'नजराना' होता. या सिनेमात त्यांनी श्यामा नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. ५० च्या दशकात सरोज यांनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्यासोबत काम केलं. १९७४ पासून त्यांनी स्वतंत्रपणे नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करायला सुरुवात केली. असं असलं तरी त्यांच्या कामाचं कौतुक अनेक वर्षांनी झालं. सरोज खान यांनी वयाच्या १३ व्या वर्षी डान्स मास्टर बी. सोहनलाल यांच्याशी लग्न केलं. तेव्हा सोहनलाल यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना चार मुलंही होती. सरोज यांनी बी. सोहनलाल यांच्यासोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. एका मुलाखतीत सरोज यांनी याबद्दल बोलताना स्पष्ट केलं होतं की, 'मी स्वखुशीने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी मला अनेकांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली का असा प्रश्न विचारला. पण असं काही नव्हतं. मी स्वखूशीने हा धर्म स्वीकारला होता. इस्लाममधून मला प्रेरणा मिळते.' सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होती. संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास'मधील 'डोला रे डोला', माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' आणि २००७ मध्ये आलेल्या 'जब वी मेट' सिनेमातील 'ये इश्क हाए' या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्यांनी काम करणं कमी केलं होतं. ८० च्या दशकात त्यांनी श्रीदेवी यांच्या सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. 'मैं नागिन तू सपेरा' आणि 'हवा हवाई' ही त्यांची गाणी विशेष गाजली. कंगना रणौतच्या मणिकर्णिकी सिनेमात त्यांनी काम केलं. तसेच २०१५ मध्ये आलेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न' सिनेमासाठीही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. तसेच गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'कलंक' सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षितसोबत अखेरचं काम केलं. करण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' सिनेमात सरोज खान यांनी 'तबाह हो गये' हे गाणं नृत्य दिग्दर्शित केलं होतं. या गाण्यावर माधुरी दीक्षितने ठेका धरला होता. २२ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी नृत्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iqWY5m