Full Width(True/False)

TikTok ने भारतातून हटवले १.६५ कोटी व्हिडिओ

नवी दिल्लीः भारत सरकारकडून ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात प्रसिद्ध टिकटॉकचा सुद्धा समावेश आहे. भारतात सर्वात प्रसिद्ध अॅप बनले होते. अॅक्टिव्ह युजर्स ते डाऊनलोड्स आणि रिविन्यू मध्येही टिकटॉक नंबर वन बनले होते. भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर टिकटॉकने आता भारतातील १.६५ कोटी व्हिडिओज टिकटॉकवरून हटवले आहे. टिकटॉकने याची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. वाचाः रिपोर्टच्या माहितीनुसार, टिकटॉककडून भारतात १.६५ कोटी व्हिडिओज हटवले गेले आहेत. ही संक्या अन्य देशाच्या तुलनेत चार पट अधिक अधिक आहे. पाकिस्तानमध्ये ३७ लाख व्हिडिओ हटवले होते. आणि हा देश तिसऱ्या स्थानावर होता. व्हिडिओ हटवल्यानंतर दुसऱ्या नंबरवर यूएस देश आहे. ४६ लाख व्हिडिओज हटवले होते. चौथ्या नंबवरवर २० लाख व्हिडिओजसह यूके आणि १३ लाखांसह व्हिडिओ असलेला रशिया पाचवा देश आहे. वाचाः म्हणून हटवले व्हिडिओ टिकटॉककडून हटवण्यात आलेल्या व्हिडिओज आकडा २०१९ मधील होता. ग्लोबल ट्रान्सपॅरेंसी रिपोर्टमध्ये टिकटॉककडून सांगण्यात आले आहे की, हे व्हिडिओ हटवण्याचे मुख्य कारण म्हणजे, अडल्ट न्यूडिटी आणि सेक्सुअल अॅक्टिविटी व्हिडिओज मध्ये दिसत होते. हे एकमेव कारण नाही, हे व्हिडिओज हटवण्यासाठी. या शिवाय, अल्कहोल, ड्रग घेण्यासाठी तसेच स्वतःला नुकसान पोहोचवण्यासाठी हिंसक तसेच सुसाईड व्हिडिओजचा या यात समावेश होता. वाचाः सरकारसोबत शेयर केला डेटा सीएनबीसीकडून शेयर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, सरकार आणि लॉ एजन्सी यांच्याकडून टिकटॉकच्या पॅरेंट कंपनी बाइट डान्सला जवळपास ५०० रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. तसेच हे व्हिडिओज हटवण्याची मागणी केली होती. टिकटॉककडून सांगण्यात आले आहे की, ९० टक्के प्रकरणे हे भारत सरकारसोबत डेटा शेयर केले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WadE7w