Full Width(True/False)

या युजर्संना एअरटेलचा फ्रीमध्ये 1GB हाय स्पीड डेटा, फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलकडून आपल्या युजर्संना १ जीबी हाय स्पीड डेटा, इनकमिंग आणि आउटगोईंग व्हाईस कॉल्स ऑफर केला जात आहे. कंपनी तीन दिवसांसाठी ट्रायल बेसेसवर प्रीपेड युजर्सला फ्रीमध्ये डेटा आणि कॉलिंग देत आहे. जे खूप दिवसांपासून इनअॅक्टिव आहेत. तसेच अकाउंट रिचार्ज करीत नाहीत. याआधी समोर आले होते की, कमी किंमतीच्या ४८ रुपये आणि ४९ रुपयांच्या प्लान्सवर १ जीबी हाय स्पीड डेटा दिला जात आहे. वाचाः कंपनी आपल्या युजर्संना फ्री डेटा देत आहे. तसेच स्वस्त प्लान वरून रिचार्ज करीत आहे. किंवा ज्यांनी खूप दिवसांपासून रिचार्ज केले नाही. अशा युजर्संना ट्रायल बेसिसवर युजर्संना फ्री बेनिफिट्स देऊन कंपनी हे ग्राहक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच प्रतिस्पर्धी कंपनीना टक्कर देऊ शकते. OnlyTech च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, एयरटेल आपल्या काही युजर्संना एसएमएस पाठवून फ्री बेनिफिट्स ऑफरची माहिती देत आहे. वाचाः ३ दिवसांसाठी मिळतोय फ्री ट्रायल रिपोर्टमध्ये शेयर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉट मध्ये १ जीबी डेटा आणि कॉल्स फ्री देण्याची माहिती हायलाईट करण्यात आली आहे. तसेच तीन दिवसांपर्यंत ट्रायल बेसिसवर युजर्संना ही ऑफर दिली जात आहे. कंपनी युजर्संना यापुढे बेनिफिट्स मिळवण्यासाठी अनलिमिटेड प्लान्सला रिचार्ज करण्यास सांगू शकते. कंपनीकडून फ्री कॉलिंग आणि डेटा मिळवणाऱ्या एका युजर्सला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला होता. त्याने आपले अकाउंट रिचार्ज केले नव्हते. वाचाः स्वस्त प्लानवर जबरदस्त बेनिफिट आतापर्यंत अधिकृत माहिती समोर आली नाही. कंपनी कोणत्या आधारावर युजर्संना या ट्रायल अंतर्गत युजर्संची निवड करीत आहे. तसेच एअरटेलचा फ्री ट्रायल कोणत्या सर्कलमध्ये मिळत आहे. किंवा देशभरातील युजर्संना मिळणार आहे. परंतु, सध्या एअरटेलला आपले युजर्सं कायम ठेवायचे आहेत. त्यामुळे कमी किंमतीतील प्लान्सवर सुद्धा चांगले बेनिफिट्स युजर्संना ऑफर केले जात आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iumsOt