Full Width(True/False)

रियलमी स्मार्ट टीव्ही आता दुकानात मिळणार, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः चीनची कंपनी रियलमीचा Realme आता ऑफलाइन म्हणजेच दुकानातून खरेदी करता येवू शकणार आहे. भारतात १२५० रिटेल स्टोरवर या टीव्हीची विक्री सुरू करण्यात आली आहे. रियलमी ३२ इंच आणि ४३ इंचाचा टीव्हीचे दोन्ही व्हेरियंट दुकानातून खरेदी करता येवू शकणार आहेत. याआधी रियलमीचे स्मार्ट टीव्हीची विक्री केवळ एक्सक्लूसिव्ही आणि फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या वेबसाईटवरून ऑनलाइन होत होती. रियलमी स्मार्ट टीव्हीचा सामना आता टीसीएल, व्हीयू आणि शाओमी या सारख्या कंपन्यासोबत होईल. वाचाः रियलमी स्मार्ट टीव्हीची किंमत Realme Smart TV च्या ३२ इंचाच्या व्हेरियंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर ४३ इंचाच्या टीव्हीची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. हे दोन्ही व्हेरियंट यावर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आले आहेत. परंतु, याची विक्री ऑनलाइन स्टोरवरून होत होती. परंतु, आता कंपनी या टीव्हीची विक्री ऑफलाइन उपलब्ध करण्यात आली आहे. वाचाः टीव्हीचे खास वैशिष्ट्ये ३२ इंच टीव्हीचे रिझॉल्यूशन 1366x768 पिक्सल आहे. ही टीव्ही एचडी रेडी आहे. तर ४३ इंचाच्या टीव्हीचा रिझॉल्यूशन 1920x1080 पिक्सल आहे. म्हणजेच फुल एचडी टीव्ही आहे. टीव्हीत अँड्रॉयड पाय ९.० चा सपोर्ट मिळणार आहे. तसेच युजर्संना यात प्ले स्टोरचा वापर करता येवू शकणार आहे. तसेच मनपसंत अॅप डाउनलोड करता येवू शकतील. टीव्हीच्या डिस्प्लेचा ब्राईटनेस ४०० निट्स आहे. तसेच या टीव्हीला HDR आणि HDR10 सपोर्ट मिळणार आहे. टीव्हीत १ जीबी रॅम सोबत ८ जीबी स्टोरेज दिला आहे. तसेच MediaTek MSD6683 प्रोसेसर दिला आहे. वाचाः साऊंडसाठी यात २४ वॉटचे स्पीकर दिले आहे. स्पीकर सोबत दोन ट्विटर्स सुद्धा आहे. याशिवाय डॉल्बी एटम आणि ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट दिला आहे. टीव्हीत २.४ जीएचझेड चे वाय फाय आणि इंफ्रारेड देण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gMI5sV