Full Width(True/False)

जबरदस्त प्रीपेड प्लान, ७८ रुपयांत रोज 3GB डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनेक जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये अधिक डेटा आणि फ्री कॉलिंगच्या अनेक प्लानचा समावेश आहे. कंपनीच्या पोर्टफोलियो मध्ये रोज ३ जीबी डेटा देणाऱ्या प्लानची संख्या सुद्धा कमी नाही. रोज ३ जीबी डेटा प्लान ऑफर करणाऱ्या प्लानची किंमत ७८ रुपयांपासून सुरू होते. जाणून घ्या प्लानविषयी. ज्याच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो तसेच मिळते. वाचाः बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लान बीएसएनएलच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. यात युजर्संना प्लानसोबत कॉलिंगसाठी २५० FUP मिनट्स मिळतात. ८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये इरॉज नाऊचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते. हा प्लान बीएसएनएलच्या काही निवडक सर्कलमध्ये उपलब्ध आहे. वाचाः बीएसएनएलचा २४७ रुपयांचा एसटीव्ही ३६ दिवसांची वैधता असलेल्या या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये रोज ३ जीबी डेटासोबत फ्री कॉलिंग चा फायदा मिळतो. फ्री कॉलिंगमध्ये २५० मिनिट्स मिळतात. प्लानमध्ये मिळणारा डेली डेटा संपल्यानंत इंटरनेट स्पीड 80 Kbps वर जातो. हा प्लान बीएसएनएलच्या जवळपास सर्वच सर्कलमध्ये उपलब्ध आहे. वाचाः बीएसएनएलचा ९९७ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये युजर्संना रोज ३ जीबी डेटा मिळतो. कंपनी रोज ३ जीबी डेटाचा फायदा त्याच युजर्संना देते. जे पहिल्यांदा रिचार्ज करतात. याला फर्स्ट रिचार्ज कूपन म्हणून ओळखले जाते. बाकी प्लान्स प्रमाणे कॉलिंगसाठी यात FUP सोबत २५० मिनिट्स मिळतात. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्समध्ये दोन महिन्यांसाठी फ्री कॉलर ट्यूनचा समावेश आहे. वाचाः बीएसएनएलचा १९९९ रुपयांचा प्लान रोज ३ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस सोबत फ्री कॉलिंग साठी २५० मिनिट्स मिळतात. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होऊन ती 80 Kbps वर जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2E8LaoM