Full Width(True/False)

क्वॉड कॅमेरा, 5000mAh बॅटरीच्या स्मार्टफोनचा आज सेल, किंमत १० हजारांपेक्षा कमी

नवी दिल्लीः जर तुम्हाला कमी किंमतीत क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप आणि 5000mAh बॅटरीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर खरेदीसाठी चा एक चांगला ऑप्शन आहे. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या स्मार्टफोनचा आज सेल आहे. आज दुपारी १२ वाजता या फोनचा फ्लॅश सेल ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः किंमत आणि फीचर्स Infinix Hot 9 स्मार्टफोनला एकाच व्हेरियंट मध्ये उतरवले आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज फोनमध्ये दिला आहे. या फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे. ग्राहकांना हा फोन दोन कलरमध्ये खरेदी करता येवू शकतो. आजच्या या सेलमध्ये फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बज कार्ड युजर्संना ५ टक्के फायदा मिळणार आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय मिळणार आहे. वाचाः Infinix Hot 9 ची वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा मोठा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1600x720 पिक्सल्स आहे. यात पंच होल कटआउट टॉप लेफ्ट कॉर्नर मध्ये युजर्संना मिळतो. फोनमध्ये MediaTek Helio P22 ऑक्टा-कोर चिपसेट दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मिळतो. मायक्रोएसडीकार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढतवा येवू शकते. वाचाः या फोनमध्ये रियर पॅनेलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये मेन कॅमेरा १३ मेगापिक्सलचा तसेच २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ व एक लो लाइट सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॅनेलवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YdIPQu