नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ब्रॉडबँड प्लान्समध्ये खूप सारे बदल केलेले आहेत. लॉकडाउन मुळे सुरू झालेला वर्क फ्रॉम होम मध्ये युजर्संना डेटाची कुठलीही कमतरता भासू नये, यासाठी कंपन्यांनी जुन्या प्लान्सला रिवाइज केले आहे. तसेच यासोबत ऑफर्सही दिल्या आहेत. युजर्संना सुद्धा कमी किंमतीत जास्त बेनिफिट ऑफरचे ब्रॉडबँड प्लान पसंत पडत असतात. ग्राहकांची पसंती डोळ्यासमोर ठेवून कंपन्यांनी ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत जबरदस्त प्लान ऑफर केले आहेत. Airtel vs या चार कंपन्यांचा ब्रॉडबँड प्लान विषयी जाणून घ्या सविस्तर... वाचाः एअरटेल एक्स्ट्रीम फायबर ४९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये 40Mbps ची इंटरनेट स्पीड मिळते. प्लाने खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात अनलिमिटेड इंटरनेट मिळते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला देशभरात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. या प्लानमध्ये कंपनी एअरटेल एक्स्ट्रीम अॅप आणि विंक म्यूझिक सोबत अनेक ओटीटी अॅप्स फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. वाचाः बीएसएनएलचा ४९९ रुपयांचा प्लान बीएसएनएलच्या या प्लानचे संपूर्ण नाव BSNL Bharat Fibre 100GB CUL आहे. प्लानमध्ये कंपनी 20Mbps च्या स्पीडने एकूण 100GB डेटा ऑफर करते. डाउनलोड साठी या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड डेटा मिळतो. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात सब्सक्रायबर्संना देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल करू शकता. वाचाः रिलायन्स जिओ फायबरचा ३९९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये ३० एमबीपीएसच्या इंटरनेट स्पीड सोबत अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. वाचाः एक्साइटेलचा ३९९ रुपयांचा प्लान Excitel च्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये वार्षिक सब्सक्रायबर्संना युजर्संना १०० एमबीपीएसची स्पीड मिळते. कंपनी या प्लानला १ डिसेंबर २०२० पासून ऑफर करीत आहे. हा प्लान अनलिमिटेड डेटा सोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n50DXB