Full Width(True/False)

तो तर आमच्या संपूर्ण कुटुंबाचा प्राण आहे- मान्यता दत्त

मुंबई- काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला झाल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर, संजय सातत्याने इस्पितळात पुढील तपासणीसाठी जाताना दिसत आहे. आता संजय दत्तच्या आरोग्यासंदर्भात पत्नी मान्यता दत्तने अधिकृत स्टेटमेन्ट शेअर केलं आहे. मान्यताआधी संजयने सोशल मीडियावर ट्रीटमेन्टसाठी कामांमधून थोडा ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं. चाहते आणि शुभेच्छूकांचे आभार संजूला एवढी वर्ष दिलेल्या प्रेम आणि स्नेहाबद्दल मी सर्व चाहत्यांचे आणि शुभेच्छुकांचे मनापासून आभार मानते. संजूने त्याच्या आयुष्यात बरेच चढ- उतार पाहिले आहेत. परंतु तुमच्या प्रेमाने आणि समर्थनाने त्याला प्रत्येक कठीण टप्प्यात धैर्य दिलं आणि यासाठी आम्ही नेहमीच आभारी आहोत. आता आम्ही पुन्हा एकदा कठीण परीक्षेचा सामना करत आहोत. आशा आहे की यावेळी देखील त्याला समान प्रेम आणि धैर्य मिळेल. सकारात्मक होऊन लढायची लढाई एक कुटुंब म्हणून आम्ही सकारात्मकतेसह या कठीण काळाचा सामना करण्याचं ठरवलं आहे. आम्ही शक्य तितकं आयुष्य सर्वसामान्यपणे जगणार आहोत. कारण ही एक दीर्घ प्रवासाची कठीण लढाई आहे. संजूसाठी आम्ही हे काम नकारात्मकतेशिवाय करणार आहोत. मान्यता इस्पितळात जाऊ शकत नाही या कठीण परिस्थितीत, दुर्दैवाने, मी माझ्या घरी होम क्वारन्टीन असल्यामुळे इस्पितळात संजूसोबत जाऊ शकत नाहीत. पण आता काही दिवसांमध्ये हे क्वारन्टीन संपणार आहे. प्रत्येक लढाईत एक माणूस मशाल घेऊन पुढे चालत असतो तर दुसरा किल्ला मजबूत ठेवतो. प्रिया, जिने गेल्या दोन दशकांपासून आमच्या कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या कॅन्सर फाउंडेशनसाठी काम केलं आहे आणि जिने आपल्या आईला या आजाराशी लढताना पाहिलं आहे. ती आमची मशाल आहे. मी मागे किल्ला सांभाळत आहे. कर्करोगाच्या स्टेजचा कोणताही अंदाज बांधू नका मी प्रत्येकाला हे सांगू इच्छिते की, संजू मुंबईत प्राथमिक उपचार पूर्ण करत आहे. कोविडची स्थिती सुधारल्यानंतर आम्ही पुढचे उपचार आणि प्रवास याच्या योजना आखू. सध्या संजू कोकिलाबेन रुग्णालयात अत्यंत आदरणीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. मी सर्वांना हात जोडून विनंती करते की कोणीही त्याच्या आजारपणाच्या स्टेजचा अनुमान बांधू नका आणि डॉक्टरांना त्यांचे काम करू द्या. आम्ही तुम्हाला महत्त्वपूर्ण घडामोडीची माहिती वेळोवेळी देत राहू. आमचं कुटुंब पुरतं हादरून गेलं आहे संजू फक्त माझ्या मुलांचा पिता आणि माझा पती नाहीये तर आई- वडिलांच्या निधनानंतर तो अंजू आणि प्रियासाठी वडिलांसारखा आहे. तो आमच्या कुटुंबासाठी सर्वकाही आहे. आमचं कुटुंब पुरतं हादरून गेलं आहे. पण आम्ही आता लढायला तयार आहोत. देव आणि तुमच्या प्रार्थनेसह आपण एकत्र या परिस्थितीवर मात करू आणि विजय मिळवू.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ElalnS