बरेली- बॉलिवूड अभिनेत्री यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जगदीश यांच्यासह वीज विभागाच्या अजून दोन अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. याबद्दल जिल्हा सर्विलान्स अधिकारी डॉ. अशोक कुमार यांनी दिली. कुमार यांनी बुधवारी सांगितलं की, दिशाचे वडील आणि विभागाचे अन्य दोन अधिकारी ट्रान्सफॉर्मर घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी लखनऊ येथे आले होते. या तीनही अधिकाऱ्यांची करोना रिपोर्ट आली असून ते पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. ४८ तासांसाठी ऑफीस बंद कुमार पुढे म्हणाले की, दिशाचे वडील विद्युत विभागाच्या दक्षता युनिटमध्ये डेप्युटी एसपी म्हणून कार्यरत आहेत. सध्या विभागीय मुख्य अभियंता कार्यालयाला ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. सायबर फसवणुकीपासून थोडक्यात वाचले होते जगदीश काही दिवसांपूर्वी जगदीश पाटणी तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा ते सायबर फसवणुकीपासून थोडक्यात वाचले होते. त्यांचा क्लोन फेसबुक आयडी तयार करून काही ओळखीच्या व्यक्तींना मेसेज पाठवण्यात आले होते. जगदीश यांनी याची तक्रार सायबर सेलमध्ये केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EX4eGT