Full Width(True/False)

अमेरिकन कंपनीचा १०० तासांचा बॅटरी बॅकअपचा इयरबड्स भारतात लाँच

नवी दिल्लीः अमेरिकन कंपनी साउंडकोर बाय अंकरने भारतात आपला लाइफ डॉट 2 ब्लूटूथ हेडसेट () लाँच केला आहे.या वायरलेस ब्लूटूथ इयरबड्सला डॅमेज प्रूफ मध्ये ठेवण्यात आले आहे. याची बॅटरी जबरदस्त असून १०० तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या इयरबड्सचे आणखी खास वैशिष्ट्ये म्हणेज याला १८ महिन्यांची वॉरंटी मिळत आहे. हे ब्लॅक फिनिशिंग सोबत येते. याची किंमत ३४९९ रुपये आहे. वाचाः या इयरबड्स मध्ये फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. तसेच यात १०० तासांपर्यंत प्लेबॅक देण्याची क्षमता आहे. कंपनीचा दावा आहे की, केवळ १० मिनिटाच्या चार्जिंगवर हे इयरबड्स ९० मिनिटांची म्यूझिक प्लेबॅक देवू शकते. या इयरबड्स मध्ये जबरदस्त फिटिंग साठी सिलिकॉन कोटिंग देण्यात आली आहे. यात ८ एमएम ची ट्रिपल लेयर ड्रायवर्सचा वापर करण्यात आला आहे. ज्यात म्यूजिक दरम्यान ४० टक्के लो फ्रीक्वेंसी (बास) आणि १०० टक्के जास्त हाय फ्रीक्वेंसी (ट्रेबल) मिळते. चांगल्या कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले आहे. वाचाः याआधी कंपनीने भारतात स्पेस एनसी अॅक्टिव नॉईस कॅन्सिलिंग वायरलेस हेडफोन लाँच केला होता. यासोबत २० तासांचा प्लेटाइम दिला आहे. तसेच १८ महिन्यांची वॉरंटी दिली आहे. कंपनीने याच्या बॅटरीवरून २० तासांपर्यंत प्लेबॅक आणि वायर्ड मोडवर ५० तासांचा प्ले टाइम होत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aoR8O9