Full Width(True/False)

सॅमसंगचे ५ स्मार्टफोन, किंमत २० हजारांपेक्षा कमी

नवी दिल्लीः भारतात चायनीज स्मार्टफोन खरेदीला रेड सिग्नल अनेक जण दाखवत आहेत. त्यामुळे भारतात सॅमसंग, एलजी आणि नोकियाच्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. गणराज्य दिनानिमित्त जर तुम्हाला चायनीज फोन खरेदी करायचा नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. या बातमीत सॅमसंगचे पाच फोन आहेत. या फोनची किंमत २० हजारांपेक्षा कमी आहे. वाचाः Samsung Galaxy M21 सॅमसंगच्या एम सीरीजचा जबरदस्त स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy M21 होय. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १४ हजार ४९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिलाआहे. तसेच ६ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. वाचाः Samsung Galaxy A20s सॅमसंग गॅलेक्सीचा आणखी एक Samsung Galaxy A20s स्मार्टफोन या यादीत आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ६९५ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा टीएफटी डिस्प्ले, ऑक्टा-कोर प्रोसेसर 13MP + 8 MP + 5MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ४ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः Samsung Galaxy M31s सॅमसंगचा Galaxy M31s या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच एक्सिनॉज 9611 प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम आणइ १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये चार रियर कॅमेरे (64+12+5+5) दिले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. कॅमेऱ्यासोबत नाइट मोड, 4के रिकॉर्डिंग आणि सिंगल शॉट यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. फोनच्या बॉक्समध्ये 25W फास्ट चार्जर सुद्धा देण्यात आला आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः Samsung Galaxy A21s या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, Exynos 850 प्रोसेसर दिला आहे. तसेच चार रियर कॅमेरे (48+8+2+2) दिले आहेत. १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात १५ वॉट फास्ट चार्जिंगसोबत 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः Samsung Galaxy A50s या फोनमध्ये ६.४ इंचाचा एफएचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले, एक्सिनॉस 9610 प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी प्रेमींसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fWrul9