Full Width(True/False)

काही महिन्यांपूर्वी अमर सिंह यांनी बीग बींसाठी केलं होतं भावूक ट्विट

मुंबई: समाजवादी पक्षाचे (SP) माजी नेते आणि ( ) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. काही महिन्यांपूर्वी आजारी असलेल्या यांनी उपचारासाठी सिंगापूर गाठलं होतं. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथंच उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. काही महिन्यांपूर्वी आजारपणामुळे कठिण परिस्थितीचा सामना करत असताना त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटद्वारे बॉलिवूडचे शहेनशाह यांच्यासाठी एक भावूक ट्विट केलं होतं. या ट्विटद्वारे अमर सिंह यांनी बीग बी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली होती.'आजच्याच दिवशी माझे वडील स्वर्गवासी झाले होते. गेल्या दशकाभरापासून या तारखेला मला यांच्याकडून मेसेज येतो. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये अधिक स्नेह असतो आणि त्यात काही कमी-अधिक अपेक्षा किंवा उपेक्षा होते, तेव्हा ते संबंध अधिक तीव्रतेनं बिघडतात. संबंध जेवढे जवळचे असतात, तेवढेच ते संबंध तुटण्याचा त्रास जास्त होतो' असंही अमर सिंह यांनी म्हटलं होतं. उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं आजपर्यंत वजन होतं. अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झाली होती. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती. आजारी पडण्यापूर्वी ते भाजपच्या अतिशय जवळही आले होते. अमर सिंह यांचे बच्चन कुटुंबीयाशी संबंध का बिघडले? काही वर्षांपूर्वी, महिलांविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांबद्दल जया बच्चन यांनी एक भाषण दिलं होतं. यावर पलटवार करताना अमर सिंह यांनी जया बच्चन यांना सुनावलं होतं. 'तुम्ही एक आई आहात, पत्नी आहात. आई-पत्नीच्या हातात सामाजिक रिमोट असतो. तुम्ही तुमच्या पतीला का नाही सांगत की जुम्मा चुम्मा दे दे करू नका. तुम्ही पतीला का सांगत नाहीत की, पावसात भिजणाऱ्या नायिकेसोबत आज रपट जइयो, हमे न भुलइयो करू नका... तुम्ही तुमच्या सुनेला ए दिल है मुश्किलमध्ये जी दृश्यं केलेत ते करू नको, असं का सांगत नाहीत. ज्या सिनेमांत नायिका जवळपास नग्न होते, असे दृश्यं करू नको असं तुम्ही तुमचा मुलगा अभिषेकला का सांगत नाहीत' असे तिखट आणि बोचरे सवाल विचारत अमर सिंह यांनी बच्चन कुटुंबीयांवर टीका केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hXS26O