Full Width(True/False)

रियलमीने भारतात लाँच केले स्वस्त वायरलेस चार्जर, किंमत पाहा

नवी दिल्लीः सध्या वायरलेस चार्जिंग सपोर्टच्या डिव्हाईसची मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी ने भारतात आपले प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत कमी किंमतीतील नवीन १० वॉट लाँच केला आहे. कंपनीने याची किंमत ८९९ रुपये ठेवली आहे. ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Realme.com वरून हे चार्जर खरेदी करता येवू शकते. युजर्संना या वायरलेस चार्जरला सिंगल ग्रे कलर व्हेरियंट मध्ये खरेदी करता येवू शकते. वाचाः चार्जरमध्ये काय आहे खास या चार्जरमध्ये तुम्हाला वायरलेस इयरबड्स Realme Buds Air शिवाय, वायरलेस चार्जिंग सपोर्ट करणारे स्मार्टफोन व अन्य डिव्हाईस सुद्धा चार्ज करु शकते. यात फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सुद्धा देण्यात आली आहे. यात 5V/9V टाइप-सी इनपुट पोर्ट देण्यात आले आहे. अँड्रॉयड फोनसाठी यात १० वॉट आणि अॅपल आयफोनसाठी ७.५ वॉटचे अधिक आऊटपूट मिळते. यात ५० सेमीचे चार्जिंग केबल सुद्धा देण्यात आले आहे. वाचाः डिझाईनमध्ये याला गोल शेप दिला आहे. यात रियलमीने स्पेशल मॅट सॉफ्ट पेंटचा वापर केला आहे. त्यामुळे याला स्क्रॅच येत नाही. तसेच बरोबर मध्य भागी यात लोगो बसवला आहे. हा पॉकेट साईजचाआहे. केवळ ९एमएम स्लीम आहे. त्यामुळे ते कुठेही घेवून जाता येते. वाचाः चार्जरचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे हे चावी, क्रेडिट कार्ड किंवा अन्य धातूच्या वस्तूंवर ठेवल्यास आपोपाप बंद होते. याशिवाय, यात सिक्योरिटीची मल्टिपल लेअर देण्यात आली आहे. जी डिव्हाईसला फुल चार्ज झाल्यानंतर आऊटपूट पॉवरला ऑटोमॅटिकली बदलते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hWBkVp