नवी दिल्लीः Google ने चीन संबंधित जवळपास २५०० हून अधिक यूट्यूब चॅनेल डिलीट केले आहेत. या चॅनेल्सवरून भ्रमित माहिती पसरवली जात होती. त्यामुळे गुगलने व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. एल्फाबेटची मालकी असलेली कंपनी गुगलने सांगितले की, यूट्यूब चॅनेलला एप्रिल आणि जून दरम्यान यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे. वाचाः यूट्यूबने सांगितले की, चॅनेल्सवर साधारणपणे स्पॅमी, नॉन पॉलिटिकली कंटेंट पोस्ट केले जात होते. परंतु, यात पॉलिटिक्स संबंधित काही माहिती होती. गुगलने आपल्या भ्रामक माहितीसाठी चालणाऱ्या ऑपरेशनच्या तिमाही बुलेटिनमध्ये ही माहिती दिली. गुगलने या चॅनेलची नावे उघड करण्यास टाळले आहे. परंतु, यासंबंधी माहिती देताना सांगितले की, ट्विटर वर सुद्धा असेच अॅक्टिवेट असलेल्या व्हिडिओजची लिंक पाहिली गेली आहे. सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनी Graphika ने एप्रिल मध्ये डिसइन्फर्मेशन मोहीम अंतर्गत याची ओळख पटवली होती. वाचाः अमेरिकेत चीनी दुतावासने या संबंधी अद्याप कोणतीही टिप्पणी केली नाही. याआधी चीन भ्रामक आणि चुकीची माहिती पसरवण्याचे सर्व दावे चीनने फेटाळून लावले आहेत. गुगल आणि फेसबुक यासारख्या कंपन्या लागोपाठी भ्रामक माहिती आणि फेक न्यूज वर अपडेट देत आहे. ऑनलाइन प्रोपागेंडा विरोधात लढाई लढत आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑनलाइन प्रोपागेंडा ला वाचवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहे. गुगलने आपल्या बुलेटिमध्ये इराण आणि रशिया संबंधीत अॅक्टिविटीची माहिती सांगितली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33vbCn6