Full Width(True/False)

हॅकरच्या शिक्षेवर निर्णय, अन् सुरू झाला पॉर्न व्हिडिओ

नवी दिल्लीः वर हॅकिंगचे सर्वात मोठे प्रकरण १५ जुलै रोजी समोर आले होते. एकाचवेळी १३० हाय प्रोफाईल ट्विटर अकाउंट्स हॅक करण्यात आले होते. या सर्व हॅकिंगमागे अवघ्या एका १७ वर्षीय मुलाचा हात होता. त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. या १७ वर्षीय मुलाने ज्यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. त्या अकाउंटमध्ये अमेरिकेचे माजी उप राष्ट्रपती जोई बिडेन, बिल गेट्स आणि एलन मस्क या सारख्या दिग्गज नेत्यांच्या यात समावेश होता. परंतु, या हॅकरला अटक करुन ऑनलाइन सुनावणी करताना एक वेगळीच घटना घडली. वाचाः १७ वर्षीय ग्राहम इवान क्लार्कला ट्विटर हॅकिंगचा मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. फेडरल अथॉरिटिज ट्विटर हॅक च्या आधी ग्राहमला ट्रॅक करीत होती. त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. शुक्रवारी अटक केल्यानंतर त्याची कोर्टात सुनावणी सुरू करण्यात आली. ही सुनावणी झूमवर सुरू होती. ज्यात रॅप म्यूझिक आणि पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. ऑनलाइन कोर्टात हा प्रकार अचानक सुरू झाल्याने कोर्टातील सर्वांनाच धक्का बसला. वाचाः हॅकरला मिळाला जामीन हॅकरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अॅपल सारख्या अकाउंट्सचे अॅक्सेस मिळवले तसेच ट्विट करून बिटकॉईन सुद्धा चोरले. या हॅकिंगमध्ये १३० अकाउंट्सला हॅक करण्यात आले होते. ज्यात जवळपास १ लाक डॉलर (जवळपास ७४,८३,००० रुपये) किंमतीचे बिटकॉईन या शर्थीवर युजर्संकडून मागवण्यात आले होते की, त्यांना ते डबल करून देण्यात येतील. परंतु, कोर्टाने या सुनावणीनंतर हॅकरला जामिनावर सोडण्याचा निर्णय दिला. वाचाः ऑनलाइन सुरू झाला पॉर्न ऑनलाइन सुरू असलेल्या कोर्टात झूममध्ये पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. तसेच रॅम म्यूझिक प्ले झाला. यानंतर BBC आणि CNN सारख्या नावांसोबत फेक युजर्सं सुद्धा या मीटिंगमध्ये जोडले गेले. नंतर त्यांना हटवण्यात आले. हॅकरने इंटरनल ट्विटर सिस्टमचे अॅक्सेस इनेबल केले होते. याच्या मदतीने कंपनी कर्मचाऱ्यांची माहिती चोरली होती. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33wvCFP