Full Width(True/False)

चीनी कंपनीने लाँच केले खास 'मेड इन इंडिया' फीचर, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) ने '' यूनीवर्सल सर्च फीचर Scout लाँच केले आहे. या फीचरद्वारे वनप्लस युजर्स अॅप ड्रॉरवरून सर्च करू शकतात. कंपनीने हे फीचर भारतात डेव्हलप केले आहे. याला कंपनीने हैदराबादच्या R&D सेंटरमध्ये डेव्हलप केले आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. याचा बीटा व्हर्जन गुगल प्ले स्टोरवर डाउनलोड केला जावू शकतो. चाचणीच्या फीडबॅकनंतर हे फीचर भारतीयांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. वाचाः वाचाः कसे काम करणार वनप्लसचे स्काउट फीचर वनप्लसच्या या फीचरमधून आता युजर्स थेट अॅप ड्रॉरने सर्च करू शकतील. याआधी युजर्संना सर्चसाठी ३ किंवा त्यापेक्षा जास्त क्लिक करावे लागत होते. या फीचरचा वापर फाईल्स, कॉन्ट्रॅक्ट्स, डॉक्यूमेंट्स, म्यूझिक यासारख्या अॅप्ससाठी केला जावू शकतो. तसेच युजर्स मूव्हीज, लोकेशन्स, सर्विस आणि अन्य अॅप्ससाठी याचा वापर करू शकतात. वाचाः वाचाः भारतासाठी हे नवीन फीचर्स सुद्धा आणणार वनप्लस वनप्लस स्काउट फीचर शिवाय कंपनी भारतीय युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स घेवून येण्याची तयारी करीत आहे. यात वर्क लाइफ बॅलन्स आणि SMS कॅटगराइजेशन आणि OxygenOS 11 यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः भारतात लाँच झाला आहे स्वस्त फोन वनप्लसने भारतात आपला सर्वात स्वस्त वनप्लस नॉर्ड लाँच केला होता. फोनमध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनच्या बॅक आणि फ्रंटला कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. हा फोन ब्लू मॉर्बल आणि ग्रे ऑनिक्स या दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YhunXI