'' या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता ललित प्रभाकर यानं 'महाराष्ट्र टाइम्स' च्या लाइव्हमध्ये वाचकांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. तरुणींमध्ये लोकप्रिय असलेल्या ललितनं त्याचे छंद कोणते, तो हिंदी चित्रपटात कधी दिसणार, त्याचं नाटकावरचं प्रेम या सगळ्यावर मनमोकळेपणानं बातचीत केली. लाइव्हमध्ये गप्पा मारताना खास वाचकांसाठी त्यानं एक हिंदी कविताही सादर केली. तसंच कविता कुठेही शेअर करत नाही पण यापुढे शेअर करत जाईन, असंही त्यानं वाचकांना सांगितलं. 'मालिकेमुळे खऱ्या अर्थानं ओळख मिळाली. ती सगळ्यात मोठी घटना होती आणि त्यानंतर आयुष्यच बदलून गेलं. अजूनही प्रेक्षक आदित्य म्हणून हाक मारतात, युट्यूबवर मालिका बघतात. मी प्रेक्षकांचा आभारी आहे. म्हणूनच यापुढेही प्रेक्षकांचं असंच करायचंय', असं ललित म्हणाला. शाळेपासून अभिनयाची सुरूवातशाळेत एखाद्याला तासाला शिक्षक आले नाहीतर तर मी वर्गात सादरीकरण करायचो. तसंच कथाकथन, वक्तृत्व स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घ्यायचो. त्यानंतर 'मिती चार, कल्याण' या संस्थेत आल्यानंतर अभिनयाकडे वळायची दिशा मिळाली. या क्षेत्रात येण्याआधी नोकरी करून नाटक करेन असा विचार केला होता. पण कालांतरानं विचार बदलला आणि अभिनय क्षेत्रातच स्थिरावलो. वेगळेपण जपतोमी चित्रपट चोखंदळपणे निवडतो. आधी केलेल्या भूमिकेपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न असतो. एकाच साच्यात काम करायचं नाही म्हणूनच मी 'द रायकर केस' या हिंदी वेब सीरिजमध्ये खलनायकाची भूमिका केली. गेल्या वर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट लॉकडाउनमुळे पुढे ढकलले गेले. म्हणूनच या वर्षात 'मीडियम स्पायसी', 'झोंबिवली', 'टर्री' आणि 'कलरफुल' असे चार चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळतील. या चित्रपटांतही मी साकारत असलेल्या भूमिका एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. चित्रपटांतून अभ्यासमी सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. काही चित्रपट अभ्यास म्हणून पुन्हा पुन्हा बघतो. जुने चित्रपट, गाणी यातून बरंच शिकायला मिळतं. मला दाक्षिणात्य सिनेमेही खूप आवडतात. नाटकाचं दिग्दर्शन करेनवेळेअभावी व्यावसायिक नाटक सध्या करता येत नाही. एका वेळी वेगवेगळ्या माध्यमात काम करण्याइतकी मी धावपळ करत नाही. एका वेळी एकच काम असं मी आजवर करत आलोय. प्रायोगिक नाटकासाठी मी माझ्या परीनं काम करत असतो. पण इतक्यात एखादी मालिका करेन असं वाटत नाही. वेळ, संहिता मिळाली की नाटकाचं दिग्दर्शन मात्र नक्की करेन. पात्रांशी देवाणघेवाणआजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांमधल्या बऱ्याचशा गोष्टी मी खऱ्या आयुष्यात आधीपासूनच करत होतो असं माझ्या लक्षात आलं. प्रत्येक पात्रांमधून मी काहीतरी घेतलं आहे आणि त्या पात्रांना काहीतरी दिलंय़. पात्रांमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही प्रमाणात बदल होत असतात. अलिप्त राहतोमला सोशल मीडिया फार आवडत नाही. मला अलिप्त रहायला आवडतं. आताही मी सोशल मीडियावर जो काही सक्रिय असतो ते केवळ माझ्या कामासाठीच. नाहीतर मी त्या माध्यमावर असतो की नसतो याबाबत शंकाच आहे. प्रेक्षकांपर्यंत जे-जे पोहोचवायचं त्यासाठी शक्य ते सगळं करतो. माझ्यावर मीच घालून घेतलेली ही काही बंधनं आहेत. मला दुसऱ्यांनी लिहून दिलेलं सादर करायला आवडतं. खऱ्या आयुष्यात स्वतःचे विचार मात्र मांडता येत नाहीत. म्हणूनच सोशल मीडियावर मी माझी मतंही मांडत नाही. साठवून ठेवायला आवडत नाहीमला मोकळ्या वेळेत वाचन, भटकंती आणि गाणी ऐकायला आवडतात. मी फिरायला जातो तिथल्या नोंदी ठेवत नाही. फोटो काढण्यातही मी रमत नाही. मला गोष्टी साठवून ठेवायला आवडत नाही. त्या-त्या क्षणाचा आनंद घेण्याला मी प्राधान्य देतो. लग्नसंस्थेबद्दल प्रश्नविवाहसंस्थेबद्दल माझ्या मनात काही प्रश्न आहेत. त्याची उत्तरं मला अजून मिळाली नाहीत. तसंच माझ्या लग्नाबाबत मी अद्याप काहीच विचार केला नाही. त्यामुळे ते कधी करेन हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो. ललितशी मारलेल्या गप्पा तुम्ही या लिंकवर ऐकू शकता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iqkekl