मुंबई- सिनेअभिनेत्री दिपाली सय्यदला गेल्या काही दिवसांपासून करोनाची सुरुवातीची लक्षणं जाणवतं होती. ही लक्षणं अंगावर न काढता तिने तातडीने करोनाची चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. यासोबतच तिच्या संपर्कात आलेल्यांनाही तिने चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. दिपालीने सोशल मीडियावर मेसेज टाकत म्हटलं की, ‘करोनाची सुरुवातीची लक्षणं जाणवत असल्यामुळे आज मी करोनाची टेस्ट करून घेणार आहे. गेल्या काही दिवसांत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क आला होता. याचमुळे माझ्या संपर्कात आलेल्या कोणाला काही त्रास जाणवत असल्यास त्यांनीही स्वतःची तपासणी करून घ्यावी.’ जगावर आलेलं करोनचं संकट भयंकर असून शक्य तितक्या लवकर यातून बाहेर पडण्यासाठी जागतिक तसंच देश पातळीवरही अनेक प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीसाठी आवाहन केल्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी आर्थिक मदतीचा हात पुढं केला आहे. यात सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, यांचा समावेश आहे. दिपाली सय्यदने तब्बल ५० लाखांची आर्थिक मदत केली. दिपाली भोसले-सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मदत करोना ग्रस्तांसाठी करण्यात आली. यापूर्वी देखील दिपाली यांच्या संस्थेनं कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत केली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली होती. यासोबतच पूरपरिस्थितीचे संकट ओढावलेल्या पूरग्रस्तांच्या १ हजार मुलींच्या विवाहाची जबाबदारी अभिनेत्री दिपाली सय्यद फाऊंडेशननं घेतली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31vZVLi