नवीन दिल्लीः गुगलने अँड्रॉयड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोनमध्ये मोठे अपडेट जारी केले आहे. या अपडेटसाठी अँड्रॉयड स्मार्टफोन्स मध्ये भूकंप अलर्ट सिस्टमपासून बेडटाइम टॅबपर्यंत, पाच जबरदस्त फीचर्स येणार आहेत. गुगलने सांगितले की, हे केवळ नवीन फीचर्स युजर्संना अपडेट करण्याचे काम करतात तर त्यांची झोप नीट झाली की नाही यासाठी मदत सुद्धा करतात. जाणून घ्या या नवीन फीचर्स विषयी. वाचाः Alert System या फीचरद्वारे आता जगभरातील अँड्रॉयड फोन युजर्संना भूकंपाची माहिती होणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्स 'earthquake near me' सर्च करू शकतील. त्यानंतर त्यांना भूकंपाची वेगाने माहिती होईल. हे फीचर अँड्रॉयड ५.० आणि त्यावरील अँड्रॉयड फोन्समध्ये काम करेल. वाचाः Emergency Location Service गुगलने सांगितले की, अँड्रॉयडची इमरजन्सी लोकेशन सर्विस किंवा ELS आतापर्यंत २९ देशांतील ८० कोटीहून अधिक लोकांसाठी उपलब्ध होणार आहे. ज्यावेळी युजर्संना आपला लोकल इमरजन्सी नंबर डायल करावा वाटेल त्यावेळी त्यांना अँड्रॉयड स्मार्टफोन युजर्संसाठी डिव्हाईसची भाषा शेयर करेल. जर तुम्ही स्थानिक भाषा बोलत नसाल त्यावेळी इमरजन्सी ऑपरेटरला ट्रान्सलेटर उपलब्ध करण्यासाठी आणि मदत पाठवण्यासाठी सहकार्य करेन. वाचाः New Android Auto Update गुगलने अँड्रॉयड ऑटो साठी अपडेट जारी केले आहे. नवीन अपडेटनंतर आता युजर्संना नवीन कॅलेंडर अॅपद्वारे कारचे डिस्प्ले वर संपूर्ण दिवसाचा शेड्यूल दिसेल. कॅलेंडरमध्ये सांगितलेल्या मीटिंग लोकेशन साठी युजर्संना डायरेक्शन दिसेल. वाचाः in Clock गुगलने क्लॉक अॅपवरून नवीन बेडटाइम टॅब सुरू केले आहे. जे युजर्संना शांत झोपेसाठी मदत करेल. हे अॅप रात्रीच्या वेळी युजर्संचा स्क्रीन टाईम ट्रॅक करतो. तसेच शांत संगीत द्वारे झोपण्यास मदत करतो. वाचाः Lookout app गुगलने आपला लूकआउट अॅप साठी अपडेट जारी केले आहे. याद्वारे युजर्स मोठ्या डॉक्यूमेंट्सला स्कॅन करु शकतील. फूड लेबल्स द्वारे प्रोडक्ट्सला ओळखू शकतील. या सर्व फीचर्स शिवाय गुगलने आपल्या गुगल क्लासरूम व गुगल मीट अॅप्स मध्ये सुद्धा अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gUtprx