Full Width(True/False)

संजय दत्तला अशाप्रकारे देण्यात आली कॅन्सर असण्याची माहिती

मुंबई- आयुष्यात सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहेत असं वाटत असतानाच जीवनात एखादं मोठं वादळ येतं आणि आपण त्यासाठी अजिबात तयार नसतो. असंच काहीसं संजय दत्तसोबत झालं आहे. तो करोना व्हायरस संपण्याची आतुरतेने वाट पाहत होता. कारण 'भुज', 'पृथ्वीराज', 'शमशेरा' आणि 'केजीएफ २' च्या सेटवर जाण्यासाठी तो उत्सुक होता. पण आता त्याला कर्करोगाचे निदान झाले आहे. ऑक्सिजनची पातळी होती कमी- सूत्रांनी ईटाइम्सला दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ८ ऑगस्टला संजयला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यानंतर त्याने डॉक्टरांना कळवले. त्याला करोनाची लागण झाल्याचं सुरुवातीला वाटत होतं. घरात असणाऱ्या ऑक्सीमीटरवर तपासून पाहिलं तेव्हा त्याच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी दिसलं. संजयला तातडीने लीलावती इस्पितळात बोलावण्यात आलं. त्याची करोना टेस्टही झाली. ही टेस्ट निगेटिव्ह आली. पण तरीही त्याला करोनाची लागण झाल्यासारखेच वाटत होते. बहिणीसोबत गेलेला इस्पितळात अजून एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संजय बहीण प्रिया दत्त आणि एका मित्रासोबत इस्पितळात गेला होता. इस्पितळात पाहण्यात आलं की, त्याच्या उजव्या फुफ्फुसातून श्वास येत नाहीये. सीटी स्कॅन केले असता कळलं की त्याच्या उजव्या फुफ्फुसात काही द्रव जमा झालं आहे आणि दोन्ही फुफ्फुसात जखमाही झाल्या आहेत. संजू विचारात राहिला प्रश्न संजयला सांगण्यात आलं की त्याला इन्फेक्शन झालं असू शकतं, टीबी असू शतो, जास्त व्यायाम केल्यामुळे दुखापत झालेली असू शकते किंवा कर्करोग असू शकतो. त्याच्या फुफ्फुसातलं पाणी काढण्यात आलं. जवळपास दीड लीटर पाणी काढण्यात आलं. यानंतर जवळपास दोन दिवस तो इस्पितळातच होता. जेव्हा संजूला सांगण्यात आलं की जे पाणी काढलं आहे ते तपासासाठी पाठवण्यात आलं आहे तेव्हा त्याने अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. अशी सांगण्यात आली कर्करोगाची बातमी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला सांगण्यात आलं की त्याला PET स्कॅन करावं लागेल. त्याचं PET स्कॅन पुर्ण होणारच होतं की हिस्टोपॅथोलॉजी डिपार्टमेन्टला कळलं की त्या पाण्यात कर्करोगाचे विषाणू आहेत. याशिवाय पीईटी स्कॅनमध्येही कर्करोगाचे विषाणू असल्याचं स्पष्ट झालं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33U3Gfb