Full Width(True/False)

'सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय आणि त्याच्याच मित्रासोबत अफेअर सुरू आहे'

मुंबई: बॉलिवूड अभिनेता मृत्यू प्रकरणात त्याची मैत्रीण व अभिनेत्री हिची सीबीआयनं अखेर शुक्रवारी पहिल्यांदा चौकशी सुरू केली. दिवसभर आठ तास चौकशी केल्यानंतर सायंकाळी तिला घरी सोडण्यात आले. पण त्यापूर्वी रियानं अनेक वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मुलाखतीत रियानं सुशांतची एक्स गर्लफ्रेंड हिच्यावर देखील निशाणा साधला आहे. सुशांतच्या निधनानंतर अंकितानं अनेक वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, तसंच तिच्या भावना व्यक्त केल्या. इतकंच नाही तर सुशांतच्या कुटुंबियांच्या बाजूनं उभ राहणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं रियानं अंकितावर टीका केली आहे. गेल्या चार वर्षात अंकिता कुठं होती, आता सुशांतच्या निधनानंतर ती हे सगळं का बोलतेय, असा प्रश्न रियानं उपस्थित केला आहे. सुशांत गेल्यानंतर त्याची विधवा असल्याचं नाटक करतेय. इतकंच नाही तर सुशांतच्या मित्रासोबतच ती आता रिलेशनशीपध्ये आहे. तिचं हे वागणं समजण्यापलीकडचं असल्याचं रियानं म्हटलं आहे. सुशांतच्या घरात राहून घराचे कागदपत्र दाखवते. तिला नक्की काय साध्य करायचं आहे.असंही रियानं म्हटलं आहे. तर अंकिताला तिनं सवत म्हणून देखील संबोधलं आहे. दरम्यान, सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील एफआयआरमध्ये रिया चक्रवर्ती ही मुख्य आरोपी आहे. तसं असतानाही या प्रकरणाचा आठ दिवसांपासून तपास करणाऱ्या सीबीआयनं रियाची चौकशी केली नव्हती. अखेर शुक्रवारी सकाळी हजर राहण्याचे सीबीआयनं रियाला समन्स बजावले होते. काल सकाळी ११च्या सुमारास ती चौकशीसाठी सीबीआयच्या कलिना येथील तपास कार्यालयात आली. सायंकाळी ८ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. यादरम्यान दोन वेळा सीबीआयचं पथक वांद्रे येथील सुशांतच्या घरीदेखील जाऊन आलं. त्यानंतर सायंकाळी रियाला घरी सोडण्यात आलं. या प्रकरणात सर्वात आधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली होती. 'ईडी'ने रियासह तिचे कुटुंब तसंच एकूण १५ जणांची या प्रकरणात चौकशी केली. यामुळेच सीबीआयची सारी भीस्त ईडीवरच आहे. रियाच्या मोबाइल चॅटची माहिती तसेच सुशांत-रिया यांच्यातील संबंधांची माहिती सीबीआय ईडीकडूनच मिळवत आहे. याखेरीज अंमली पदार्थांसंबंधीच्या तपासातही अंमली पदार्थविरोधी विभागाला (एनसीबी) प्रथम माहिती ईडीकडूनच मिळाली . यानंतरही या प्रकरणाची आणखी माहिती द्यावी, असं पत्र सीबीआय व एनसीबीने ईडीला लिहिलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31B8IMf