Full Width(True/False)

धोनीसाठी रणवीरने केला होता जॉब, पण मिळाले नव्हते पैसे

मुंबई- जेव्हापासून महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तेव्हापासून देशभरातील त्याचे चाहते भावुक झाले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अभिनेता रणवीर सिंगने धोनीसाठी एक लांबलचक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जेव्हा २२ वर्षांचा रणवीर धोनीला भेटला करोना महामारीच्या काळात सध्या त्याच्या घरीच आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून धोनीला पहिल्या भेटीची आठवण शेअर केली. धोनीच्या लाखोचाहत्यांपैकी रणवीर स्वतःला त्याचा कट्टर चाहता मानतो. धोनीच्या निवृत्तीनिमित्त त्याने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. रणवीरने धोनीसोबत शेअर केलेला हा फोटो २००७-०८ मधला कर्जतच्या एनडी स्टुडिओचा आहे. याबद्दल बोलताना रणवीर म्हणाला की, 'त्यावेळी मी २२ वर्षांचा होतो, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. मी हे काम फक्त एकाच कारणासाठी केलं कारण त्या जाहिरातीत एमएस धोनी काम करणार होता. मला त्याच्यासोबत रहायचे होते. माझ्याकडून खूप काम करून घेतलं आणि त्याचे पैसेही मिळाले नाहीत. पण मला फरक पडला नाही. कारण मला फक्त धोनीसोबत रहायचे होते.' रणवीरला झाली होती इजा, पण तरीही पूर्ण केलं काम रणवीरने पुढे लिहिले की, 'त्यावेळी काम करताना मलाही दुखापत झाली होती, पण मी तरीही काम करत राहिलो कारण माझ्या या प्रामाणिक कामाच्या मोबदल्यात मला धोनीला भेटायची संधी मिळणार होती आणि कदाचित त्याच्यासोबत एक फोटोही मिळाला असता. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला धक्काच बसला होता. तो अत्यंत नम्र, गर्व नसलेला, प्रत्येकाशी आपुलकीने बोलणारा आणि प्रेमळ होता. रणवीरने त्याला पोस्टच्या शेवटी धोनीला खूपसारं प्रेम, आदर आणि शुभेच्छा दिल्या. टोपी आणि जर्सीवर घेतली स्वाक्षरी रणवीरने हेही सांगितलं की, त्याचा पहिला सिनेमा ‘बॅण्ड बाजा बारात’नंतर तो धोनीला भेटायला कसा पळाला होता. धोनी आणि रणवीरची हेअर स्टायलिस्ट सारखीच होती. सपना भवनानी दोघींसाठी हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करायची. त्यावेळी सपना रणवीरला म्हणाली की, मलाा माहितीये तू त्याचा चाहता आहेस. मेहबूब स्टुडिओमध्ये ये आणि त्याला भेट. यानंतर रणवीरने कॅप आणि जर्सीवर धोनीचा ऑटोग्राफ घेतला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PTZrbx