Full Width(True/False)

व्हायरल होतोय सुशांतचा चार बहिणींसोबतचा व्हिडिओ

मुंबई- बॉलिवूड अभिनेता याच्या निधनाला आता २ महिन्याहून जास्त काळ लोटला आहे. मात्र आजही त्याचे चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने त्याची आठवण काढत आहेत. तसेच त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी करत आहेत. चौकशीच्या मागणीत सुशांतचा एक जुना व्हिडिओ इण्टरनेटवर व्हायरल होत आहे. यात सुशांत त्याच्या चार बहिणींसोबत निवांतक्षण घालवताना दिसत आहे. सुशांत आणि त्याच्या बहिणींचा हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे हे कळू शकलेलं नाही. पण 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आसपासचा हा व्हिडिओ असावा असं म्हटलं जात आहे. व्हिडिओमध्ये सुशांतची बहीण स्वत: म्हणते की माझा भाऊ एमएस धोनी झाला. हा व्हिडिओवरून एक गोष्ट स्पष्ट होते की चारही बहिणींचं आपल्या भावावर अतोनात प्रेम होतं. दरम्यान, एक दिवसआधीच सुशांतची मोठी बहीण श्वेतासिंह किर्तीने सुशांतसाठी जागतिक प्रार्थना आयोजित केली होती. या प्रार्थनेला सुशांतच्या कुटुंबासह जगभरातील चाहत्यांनी हजेरी लावली होती. सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयदेखील या प्रकरणात उडी घेतली आहे. ईडी या प्रकरणाची मनी लॉण्ड्रिंगच्या दृष्टीने रिया आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी करत आहेत. तसेच या प्रकरणात सीबीआयनेही एफआयआर नोंदवली असून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाची सीबीआय, मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांपैकी नक्की कोण चौकशी करणार याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iKl2iT