मुंबई टाइम्स टीम गणेशोत्सव जवळ येत असल्यानं बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशावर आधारित मर्यादित भागांची एक टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. '' असं या मालिकेचं नाव असून, गणेशोत्सवाप्रमाणे ही मालिकादेखील ११ दिवसांची असणार आहे. गणरायावर आधारित या विशेष मालिकेमध्ये माता पार्वतीच्या भूमिकेत अभिनेत्री दिसेल. येतेय. भाग्यश्रीच्या लूकवरुन मालिकेची भव्यता लक्षात येऊ शकेल. भाग्यश्रीचा लूक शिबाप्रिया सेन यांनी डिझाईन केला आहे. भाग्यश्री आपल्या नव्या मालिकेविषयी म्हणाली, की ''देवयानी'नंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर 'देवा श्री गणेशा'सारखी महत्त्वपूर्ण आणि भव्यदिव्य मालिका साकारायला मिळत असल्याचा आनंद आहे. पार्वतीच्या रुपात जेव्हा मी स्वत:ला पाहिलं, तेव्हा मी भारावून गेले होते. या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आलीय. माता पार्वतीची सौम्यता तिचा हळवेपणा आणि प्रसंगी समोर येणारं रौद्र रुप हे साकारायला मिळणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.' या मालिकेच्या निमित्तानं मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी बिगबजेट मालिका आकाराला येत असल्याचं बोललं जातंय. 'महाभारत', 'राधेकृष्ण' यासारख्या भव्यदिव्य हिंदी मालिका साकारणारे निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. उंबरगाव येथे या मालिकेचा भव्य सेट आकाराला येत असून, लवकरच चित्रीकरणाचा श्रीगणेशा होणार असल्याचं कळतंय. पार्वतीच्या भूमिकेतील भाग्यश्रीचा लूक पहिल्यांदा खास 'मुंटा'शी शेअर करण्यात आलाय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kmEzrm