Full Width(True/False)

सुशांतला औषधांचा ओवरडोस द्यायची रिया चक्रवर्ती !

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये रिया चक्रवर्तीची सध्या ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान बिहार सरकारने रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एकीकडे ईडीची कारवाई तर दुसरीकडे बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल करत रियाच्या संकात अजून वाढ झाली आहे. सीबीआयनने चौकशीसाठी एसआयटी टीमची नियुक्ती केली आहे. आयपीएस मनोज शशिधर या टीमचं प्रतिनिधीत्व करत आहेत. तर ईडीने शुक्रवारी रियाला समन्स पाठवत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या चौकशीत रियाला तिची संपत्ती, उत्पन्न आणि सुशांतसोबतच्या लेन- देनबद्दल प्रश्न विचारले जातील. सुरुवातीला अभिनेत्रीने चौकशीला सामोरं जाण्यास नकार दिला होता. मात्र तिची विनंती फेटाळण्यात आली आणि कोणत्याही परिस्थितीत तिला हजर राहण्यास सांगण्यात आले. सध्या सीबीआयच्या ऑफिसमध्ये तिची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सुशांतच्या चौकशीवर बिहार पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. यात रिया सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली होती आणि त्याला औषधांचा ओव्हरडोस देत होती. बिहार सरकारकडून हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. यात पैशांसाठी सुशांतला फसवल्याचा आरोप रिया आणि तिच्या कुटुंबावर करण्यात आला आहे. रिया आणि तिच्या कुटुंबावर आरोप करत बिहार सरकारने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात बिहार पोलिसांच्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ देताना म्हटलं की, रिया आणि तिच्या कुटुंबियांनी पैसे हडपण्यासाठी सुशांतच्या संपर्कात आले. यानंतर रियाने सुशांत मानसिक आजार असल्याचं सगळ्यांना भासवलं होतं. बिहार पोलिसांच्या वरिष्ठ अधिक्षकांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिथे औषधांचा ओव्हरडोज देऊ लागली. दरम्यान, ईडीने सुशांतसिंग राजपूतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीला चौकशीसाठी बोलावले आहेत. या व्यतिरिक्त सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला उद्या ८ ऑगस्टला ईडीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kfMWFb