Full Width(True/False)

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं अमेरिकेत निधन

मुंबई- प्रसिद्ध शाज्येष्ठस्त्रीय संगीत गायक यांचं अमेरिकेतील न्यूजर्सी येथे निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मेवाती घराण्याचे पंडित जसराज यांचं सुरुवातीचं शिक्षण वडील पंडित मोतीराम यांच्याकडे झालं. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी गायक म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. तर २२ व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी पहिला स्टेज शो केला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. त्यांची मुलगी म्हणाल्या की, 'अतीशय जड अंतःकरणाने सांगावं लागत आहे की, पंडित जसराज यांचं अमेरिकेतील न्यूजर्सी येथे सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.' त्या पुढे म्हणाल्या की, 'आम्ही प्रार्थना करतो की भगवान श्रीकृष्ण त्यांचं प्रेमाने स्वर्गात स्वागत करेल. तिथे आता पंडितजी ओम नमो भगवते वासुदेवय हे गाणं फक्त त्यांच्या प्रिय देवासाठी गातील. आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास नेमही संगीतमय शांती मिळो.' २८ जानेवारी १९३० मध्ये जन्मलेल्या पंडित जसराज यांना संगीताचा वारसा लाभला होता. त्यांचा जन्मच अशा कुटुंबात झाला ज्याच्या चार पिढ्या संगीत साधनेत होत्या. वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ पंडित मणिराम यांनीचच जसराज यांचा सांभाळ केला होता. हरियाणातील हिसार येथील जसराज यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्यामुलीशी मधुरा शांताराम यांच्याशी विवाह केला होता. १९६० च्या सुमारास मधुरा आणि जसराज यांची ओळख मुंबई येथे झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y9eBye