नवी दिल्लीः डिसेंबर २०१९ मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना झटका दिला होता. कंपन्यांनी सर्वच टॅरिफ प्लान महाग केले होते. परंतु, आता ग्राहकांना पुन्हा एकदा जोरदार झटका बसणार आहे. करोना संसर्गाचा मोठा परिणाम लॉकडाउनमुळे , आणि एअरटेलच्या कंपन्यांवर पडला आहे. याची नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी कंपन्या पुन्हा एकदा आपले प्लान महाग करण्याची शक्यता आहे. वाचाः गेल्या वर्षी टॅरिफ प्लान १० ते ४० टक्के महाग केले होते. आता आणि वोडाफोन आयडिया पुन्हा एकदा टॅरिफ प्लान महाग करण्याच्या तयारीत आहे. असा दावा सीएनबीसीच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे टॅरिफ प्लान २ त ५ टक्के महाग होऊ शकतात. तर प्रत्येक सहा महिन्याला यात १० टक्के वाढ केली जावू शकते. परंतु, टेलिकॉम कंपन्यांनी यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नाही. वाचाः वाचाः एसबीआय कॅप्सचे जाणकार राजीव शर्मा यांनी आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले की, टॅरिफ वाढीनंतर आणखी एक शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, पुढील काही तिमाहीत मोबाइल टॅरिफ वाढीची शक्यता आहे. याआधी जुलै मध्ये इमर्जिंग मार्केट्स टेक्नोलॉजी, मीडिया अँड इंटरनेटमेंट अँड टेलिकम्यूनिकेशन्सचे लीटर प्रशांत सिंघल यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता, कंपन्या पुढील सहा महिने रिचार्ज प्लान महाग करू शकतील. वाचाः वाचाः सध्या अनेक जण स्वस्त रिचार्ज प्लानचा वापर करीत आहेत. त्यामुळे सध्या रिचार्जचे दर वाढवणे बरोबर नाही. परंतु, करोनामुळे ज्या टेलिकॉ़म कंपन्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. त्या कंपन्यांना वाटतेय की, १२ ते १८ महिन्यात दोन वेळेस टॅरिफ प्लान महाग करायला हवेत. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/348j7AA