मुंबई-सुशांतसिंह राजपूतचं प्रकरण वेळेनुसार अधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. मुंबई पोलिसांच्या मागणीने अनेकजण संतुष्ट नाहीत यामुळेच ते सीबीआयची मागणी करत आहेत. यानंतर सुशांतचे वडील केके सिंह यांच्या तक्रारीवर आता बिहार पोलिसही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दररोज यासंबंधीच्या नवीन माहिती समोर येतात. आता सुशांतचा मृतदेह अॅम्ब्युलन्समधून नेणाऱ्या ड्रायव्हरलाही धमक्यांचे फोन येत असल्याचं कळत आहे. आंतरराष्ट्रीय नंबरवरून येतात धमक्यांचे फोन १४ जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचं पार्थिव शरीर अॅम्ब्युलन्समध्ये ठेवताना हा ड्रायव्हर तिथे उपस्थित होता. मुंबई पोलिसांनी अॅम्ब्युलन्स आणि काही लोकांना सुशांतचा मृतदेह इस्पितळात घेऊन जाण्यासाठी सांगितलं होतं. आता त्या ड्रायव्हरला आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून धमक्या येत असल्याचं म्हटलं जात आहे. पण मुंबई पोलिसांनी ड्रायव्हरच्या विधानात तथ्य नसल्याचं सांगतं सुशांतचा मृतदेह पोलिसांनीच खाली आणल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बिहार पोलिसांना मिळत नाही मुंबई पोलिसांकडून मदत सध्या बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आली असून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची ते चौकशी करत आहेत. यात बिहार पोलिसांना मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. बिहार टीमला लीड करण्यासाठी मुंबई पोहोचलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांनाही मुंबईत एका गेस्ट हाउसमध्ये जबरदस्ती क्वारन्टीन करण्यात आले आहे. रियासह कुटुंबाने सोडलं मुंंबईतलं घर याशिवाय रिया चक्रवर्तीसह तिचं संपूर्ण कुटुंबाने मुंबईतला फ्लॅट सोडून दुसरीकडे रहायला गेली आहे. एका वृत्तवाहिनीला रियाच्या इमारतीच्या सेक्रेटरीने मुलाखत दिली. यात त्यांनी रियासह रियाचे आई- वडील आणि भाऊ यांनी मुंबईतलं राहतं घर सोडलं आणि निळ्या रंगाच्या गाडीतून ते निघून गेले. त्यांनी हेही सांगितलं की सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच त्याने या घरी येणं- जाणं बंद केलं होतं. बिहार पोलिसांपासून का पळत आहे रिया या प्रकरणात मुंबई पोलिसांप्रमाणे बिहार पोलीसही रियाची चौकशी करणार आहे. दरम्यान, रियाने सोशल मीडियावर तिची प्रतिक्रिया देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात न्यायव्यवस्थेवर तिला पूर्ण विश्वास असून तिला न्याय नक्की मिळेल असं तिने यात म्हटलं होतं. यासोबतच सुरुवातीला रियाला मुंबई पोलिसांच्या तपासणीवर विश्वास नव्हता. आता ती बिहार पोलिसांपासूनही पळत आहे. यावरूनच तिच्या वागण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30nIBaW