मुंबई- रिया चक्रवर्तीचे वकील यांनी नुकतंच सुशांतची ग्रॅटिट्युड नोट शेअर केली होती. रियाच्या डायरीमध्ये सुशांतने ही नोट लिहिली होती. या नोटमध्ये अनेकांची नावं असून सोशल मीडियावर ही नोट तुफान व्हायरल होत आहे. सुशांतच्या चाहत्यांच्या मते ते सुशांतचं अक्षर नाहीये. दरम्यान, मुंबईतील ट्रूथ लॅब्ज चे डायरेक्टर दीपक वागळे यांनी या नोटवर आपली प्रतिक्रिया दिली. नोटमध्ये लिहिली आहेत काही लोकांची नावं- सुशांतचे चाहते रिया चक्रवर्तीने शेअर केलेल्या ग्रॅटिट्यूड नोटमधलं अक्षर आणि सुशांतच्या डायरीमधलं अक्षय यांची तुलना करत आहेत. या नोटमध्ये पाच नावं लिहिण्यात आली आहेत. या व्यक्ती माझ्या आयुष्यात असल्याचा मी आभारी आहे असं या नोटमध्ये लिहिले आहे. यात लिल्लू, बेबू, सर, मॅडम आणि फज यांची नावं आहेत. रियाच्या मते, लिल्लू शौविक, बेबू रिया, सर म्हणजे रियाचे वडील आणि मॅडम म्हणजे रियाची आई आहे. या सर्वांचं सुशांतच्या आयुष्यात असण्याचा सुशांतला आनंद आहे असं त्याने नोटमध्ये लिहिलं. तज्ज्ञांनी दिली माहिती टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमने हस्ताक्षर तज्ज्ञ दीपक वागळे यांना या नोटमधील हस्ताक्षराबद्दल विचारले असता त्यांनी ही नोट सुशांतने लिहिली आहे की नाही हे कळणं कठीण असल्याचं सांगितलं. कारण मूळ पोस्टमध्ये असलेली अनेक अक्षर ग्रॅटिट्यूड पोस्टमध्ये नाहीत. शिवाय कॅपिटल लेटरचाही अभाव आहे. त्यामुळे निश्चित असं उत्तर देता येणार नाही. रियाने शेअर केले दोन फोटो रियाने या नोटसोबत सिपरचाही एक फोटो शेअर केला. या सिपरवर 'छिछोरे' लिहिलेलं होतं. रिपोर्टनुसार रियाच्या मते ही हँडनोट आणि सिपरशिवा य रियाकडे सुशांतची कोणतीच संपत्ती नाही. दरम्यान, सध्या ईडीकडून रियाची चौकशी करण्यात येत आहे. शुक्रवारी तिची जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली. यानंतर सोमवारी तिला पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ipjhaJ