मुंबई- बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने त्याचं ऑफिस जवळपास तीन महिन्यांपूर्वीच बीएमसीला वापरण्यास दिलं होतं. करोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांना इथे क्वारन्टीन करण्यास येणार होतं. पण आता या ऑफिसचं रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आलं आहे. गंभीर रुग्णांना इथे दाखल करण्यात येणार आहे. शाहरुखने करोनाग्रस्तांसाठी एप्रिल महिन्यातच त्याची चार मजली इमारत वापरण्यास दिली होती. अनेक राज्यांची शाहरुखने केली मदत शाहरुख खानने करोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता अनेक राज्यांच्या सरकारला आपणहून मदत केली होती. याशिवाय त्याने खार येथील त्याचे चार मजली ऑफिसही क्वारन्टीन सेन्टर म्हणून महाराष्ट्र सरकारला दिले होते. शनिवारी या इमातीला आता १५ बेडच्या आयसीयूमध्ये रुपांतरीत करण्यात आलं आहे. हे काम शाहरुखच्या मीर फाउंडेशन आणि हिंदुजा इस्पितळ या दोघांनी मिळून केलं आहे. शाहरुखने भारतात पसरण्याच्या सुरुवातीच्या काळातच एप्रिल महिन्यातच ही बिल्डिंग बीएमसीला दिली होती. मात्र या इमारतीचा वापर करण्यात आला नव्हता. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अनेक महिने ही इमारत रिकामीच होती. आयसोलेट रुग्णांना करणार शिफ्ट १५ जुलै पासून ही इमारत आयसीयूमध्ये रुपांतरीत करायला सुरुवात करण्यात आली. आयसोलेट केलेल्या अनेक रुग्णांना दुसऱ्या सेन्टरमध्ये हलवण्यात आलं. हिंदुजा इस्पितळातले डॉक्टर अविनाश सूपे यांनी माहिती देताना स्पष्ट केलं की, या महामारीच्याा काळात आयसीयू इस्पितळांची मोठ्या प्रमाणत गरज आहे. जिथे ऑक्सिजन टँक आणि वेन्टिलेटरची सुविधा उपलब्ध असेल. बरे झाले ५४ लोक रिपोर्टनुसार, जेव्हा हिंदुजामध्ये रुग्णांना क्वारन्टीन केलं गेलं होतं तेव्हा तिथे ६६ रुग्ण अॅडमिट होते. यातील ५४ रुग्ण बरे झाले. तर आयसीयूसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी उरलेल्या १२ रुग्णांना दुसऱ्या जागी हलवण्यात आले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30L4amd