Full Width(True/False)

'सुशांतला तर होती मरणाची भीती, तो आत्महत्या कशी करेल?'

मुंबई- सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू हे एक मोठं कोडं झालं आहे. सीबीआयसह ईडी, बिहार पोलीस, मुंबई पोलीस सारेच हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान या काळात अनेक गौप्य स्फोट झाले. यात त्याच्या मित्रांसह त्याच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आता सुशांतच्या ड्रायव्हरने अनिलने सुशांतशी निगडीत मोठा खुलासा केला आहे. एकत्र घालवायचे १५-१६ तास सुशांत सिंगच्या स्वयंपाकीपासून त्याच्या सुरक्षा रक्षकापर्यंत त्याच्याशी संबंधित अनेकांनी बर्‍याच गोष्टी सांगितल्या. दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुशांतच्या ड्रायव्हरने सांगितले की तो रोज सुशांतसोबत १५ ते १६ तास असायचा. अनिलने सांगितले की तो सुशांतला शूटवर घेऊन जायचा आणि जर त्याला तिथे काही लागलं तर अनिलच सर्व गोष्टी आणून द्यायचा. २०१८ मध्ये अनिलने सुशांतसोबत अडीच महिने काम केलं. मात्र त्या नंतर त्याला आणि बाकीच्या लोकांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आलं. अनेक कर्मचार्‍यांना काढून टाकले अनिल म्हणतो, आम्हाला का काढणयात आले हेच माहीत नाही. कदाचित तो आमच्यावर नाराज झाला असावा म्हणून त्याने माझ्यासह इतर दोन ड्रायव्हर आणि एका अंगरक्षकालाही काढून टाकलं होतं. कधी काढलं ती तारीख चांगली आठवत नाही पण 'केदारनाथ' सिनेमाच्यानंतरच काढलं. कारण तेव्हा तो 'छिछोरे' चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत होता. सुशांतला होती मृत्यूची भीती सुशांतने आत्महत्या केली यावर अनिलचा विश्वासच बसला नाही. अनिलने सांगितले की चंद्राची स्वप्न पाहणारा सुशांत आत्महत्या करेल ही गोष्ट मनाला पटतच नाही. यासोबतच सुशांत आत्महत्या का करू शकत नाही हेही अनिलने स्पष्ट केले. तो म्हणतो, मला आठवते की एकदा उशीर झाला होता आणि मी त्याची वाट पाहत होतो. त्यांची वाट पाहताना मला गाडीत झोप लागली. सर जेव्हा आले त्यांनी मला विचारलं की, मी झोपलो होतो की नाही. यानंतर सुशांतने मला गाडी न चालवण्यास सांगितले. त्या दिवशी सुशांतने स्वत: गाडी चालवली होती आणि अनिल दुसऱ्या गाडीतून आला होता. ज्या व्यक्तीला मृत्यूची इतकी भीती असेल तो आत्महत्या कशी करेल असंही अनिल म्हणाला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y1ZaHP