Full Width(True/False)

सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियाने कोणाला केले शेवटचे ५ कॉल

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीत नवनवीन खुलासे होत आहे. सुशांतच्या कॉल डिटेल्सपासून त्याच्या बँक डिटेलपर्यं अनेक गोष्टी नव्याने समोर आल्या आहेत. आता रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समधूनही अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. १४ जूनला एका महिलेशी केली एक तास चर्चा मीडिया रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीने ८ जून रोजी सुशांतचं घर सोडलं होतं. तिच्या कॉल डिटेलमध्ये समोर आलं आहे की सुशांतऐवजी तिचं महेश भट्ट यांच्याशी अनेकदा बोलणं व्हायचं. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रिया एका महिलेशी फोनवर जवळपास एक तास बोलली होती. रियाने सुशांतला फक्त ३ सेकंदांसाठी केला होता कॉल कॉल डिटेलमध्ये स्पष्ट झालं की, रिया आणि सुशांत ५ जून रोजी शेवटचे बोलले होते. रियाच्या म्हणण्यानुसार रियाने तोपर्यंत सुशांतचे घर सोडले नव्हते. ५ जून रोजी सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी सुशांतने रियाला फोन केला होता. दोघांमध्ये सुमारे २ मिनिटांचं बोलणं झालं. त्यानंतर रियाने रात्री १० च्या सुमारास सुशांतला फोन केला. हा फोन फक्त तीन सेकंदांचा होता. हे त्यांचे शेवटचे संभाषण होते. सुशांतच्या मृत्यूपूर्वी या व्यक्तींशी बोलली रिया सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी म्हणजे १३ जून रोजी रियाने कास्टिंग डायरेक्टर निशा चटालिया हिला ७ वाजून ५० मिनिटांनी फोन केला होता. रात्री ८ वाजून ५३ मिनिटांवर रिया आणि निशामध्ये १ मिनिटांचं बोलणं झालं. यादरम्यान रियाने ८ वाजून २६ मिनिटांनी दिग्दर्शक- निर्माते इंद्रजीत नातोजी यांना फोन केला होता. ९ वाजून २१ मिनिटांना तिने रूपा चड्ढा नावाच्या महिलेला फोन केला होता. रुपाशी रियाने जवळपास ७ मिनिट ८ सेकंदांपर्यंत चर्चा केली. यानंतर ९ वाजून ४३ मिनिटाला AU नावाच्या व्यक्तीला कॉल केला. या व्यक्तीशी रियाने १ मिनीट ३८ सेकंद गप्पा मारल्या. १४ जूनचे रियाचे कॉल डिटेल १४ जून रोजी रियाने एकूण नऊ फोन केले आणि तिला सात फोन आले. सुशांतचा मृत्यू झाला त्यादिवशी सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी रियाने राधिका मेहताला कॉल केला होता. दोघीही साधारणपणे ३० मिनिटं ३३ सेकंद बोलल्या. हा फोन रियाने स्वतः केला होता. त्यानंतर सकाळीच ८ वाजून ८ मिनिटांनी राधिकाने रियाला कॉल केला. परत दोघी अर्धातास बोलल्या. यानंतर तिसऱ्यांदा सकळी ८ वाजून ३८ मिनिटांनी रियाने राधिकाला कॉल केला आणि दोघई ५ मिनिटं ३८ सेकंद बोलल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DI70Qb