मुंबई :भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार याच्या एका बालमित्रानं सोशल मीडियावर विराटच्या लहानपणीची एक आठवण शेअर केली आहे. विराट अगदी लहानपणापासूनच अभिनेता याचा प्रचंड मोठा चाहता होता हे यातून समोर आलं. ही आठवण म्हणजे, स्क्रॅपबुकचं एक पान आहे, जे विराटनं आपल्या या मित्रासाठी लिहिलं होतं. शलाज सोंधी या विराटच्या बालमित्रानं आपल्या सोशल मीडियावर या पानाचा फोटो अपलोड केलाय; ज्यामध्ये 'मोस्ट अॅडमायरेबल पर्सन' म्हणून अभिनेता हृतिक रोशन असं विराटनं लिहिलं होतं. म्हणजेच विराट हृतिकचा जबरदस्त चाहता होता. हे प्रेम, हे कौतुक सुपरस्टारची प्रतिभा आणि आपल्या कामाप्रती असलेली त्याची निष्ठा यासाठी आहे, हे वेगळे संगायला नको. सोशल मीडियावरील या पोस्टनंतर, विराट आणि हृतिक या दोघांचेही चाहते इतर सोशल मीडिया प्लॅटफार्मवर देखील हे शेअर करून आपला आनंद व्यक्त करताना दिसताहेत. विराट आणि त्याच्या चाहत्यांमध्ये हे एक मोठं साम्य असल्याचं ते सांगताहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aKC6m1