मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या केसची धुरा आता सीबीआयने स्वतःच्या हाती घेतली आहे. या प्रकरणी , इंद्रजीत , संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सैमुअल मिरांडा, श्रुती मोदी आणि अन्य व्यक्तींविरोधात खटला दाखल केला आहे. या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध काय ते जाणून घेऊ.. रिया चक्रवर्ती- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती सुरुवातीपासून लोकांच्या निशाण्यावर होती. आधी सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी पटणात तिच्यासह चक्रवर्ती कुटुंबातील लोकांविरोधात एफआयआर दाखल केली. सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला कुटुंबापासून दूर केलं आणि त्याचे पैसे बळकावण्याचा आरोप केला आहे. इंद्रजीत चक्रवर्ती आणि संध्या चक्रवर्ती- रियाचे वडील इंद्रजीत आणि आई संध्या यांच्यावरही आरोप केला की त्यांनी सुशांतसोबत जवळीक निर्माण केली आणि सुशांतच्या प्रत्येक गोष्टीत ते दखल देऊ लागले. तसेच सुशांत ज्या घरात राहत होता त्या घरात भूत- प्रेत आहे असं सांगून त्याला ते घर सोडायला लावलं. शोविक चक्रवर्ती- रियाचा भाऊ शोविकबद्दल बोललं जातं की, त्याची सुशांतच्या कंपन्यांमध्ये भागीदारी होती. सुशांतच्या एकूण तीन कंपन्या होत्या. त्यातील दोन कंपन्यांमध्ये रिया स्वतः डायरेक्टर पोस्टला होती. तर तिसऱ्या कंपनीत शौविक डायरेक्टर पोस्टला होता. या कंपन्यांमध्ये सुशांतने त्याच्या आयुष्यभराच्या कमाईचा एक मोठा हिस्सा गुंतवला होता. पण रियाने आणि तिच्या कुटुंबियांनी यात किती रुपयांची गुंतवणूक केली हे अजून कळू शकले नाही. सॅम्युअल मिरांडा- सुशांतचा हाउस मॅनेजर म्हणून सॅम्युअल मिरांडाची नियुक्ती रियानेच केली होती. ईडीने सॅम्युअलशी दोनदा चौकशी केली. सुशांतच्या वडिलांनी मुलाच्या अकाउंटमधून एक मोठी रक्कम काढल्याचा आरोपही केल आहे. यामुळेच या प्रकरणात ईडीने उडी घेतली. श्रुती मोदी- सुशांतच्या बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीचीही मुंबई पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत श्रुती म्हणाली की ती जुलै २०१९ ते ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ती अभिनेत्यासोबत होती. 'छिछोरे' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानही ती सुशांतसोबत होती. तिने पोलिसांना सुशांतशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30zA8RY