Full Width(True/False)

सुशांतच्या मृत्यू हा सर्वांसाठी एक जोक झालाय; रिया भडकली

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर असलेली अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड हिनं वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. सुशांतवर मनापासून खरं प्रेम केलं हीच माझी चूक होती, असं रियानं म्हटलं आहे. सुशांत गेल्यानंतर त्याचा मृत्यू सर्वांसाठी एक विनोद झालाय. रोज नवीन काही तरी गोष्टी समोर येत असून त्या गोष्टींना काहीही अर्थ नाही, काडी मात्र तथ्य नसलेल्या गोष्टींमुळं त्याच्या मृत्यूचा आता तमाशा झाला असल्याचं रियानं या मुलाखतीत म्हटलं आहे. सुशांतचे पैसे हडप केल्याचा आपोप रियावर लावण्यात आलाय. या आरोपावर तिनं स्पष्टीकरण दिलं आहे. मी सुशांतच्या पैशांवर जगत नव्हते, आम्ही एक कपल म्हणून एकत्र राहत होतो, सुशांतची लाइफस्टाइल खर्चीक होती, त्याला स्टार प्रमाणं राहायला आवडायचं, असंही तिनं म्हटलं आहे.सुशांतच्या डिप्रेशनबद्दलही रियानं मोठा खुलासा केलाय. सुशांत २०१९ पासून नव्हे तर २०१३ पासूनच डिप्रेशनमध्ये होता, असं रियानं म्हटलं आहे. गांजाचे कनेक्शन सुशांतसिंह राजपूतकडे नोकरी करणार्‍या नीरज सिंगने सुशांत हा गांधा ओढत असल्याचा दावा केला होता. नीरजने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातून ही माहिती समोर आलीय. मृत्यूच्या काही दिवस आधी त्याने सुशांतसाठी गांजाची सिगारेट बनवून दिली होती. ज्या दिवशी सुशांतसिंहचा मृतदेह बेडरूममध्ये लटकलेला आढळला त्या दिवशी गांजा ठेवण्यात येणारा बॉक्स तपासला होता. तो बॉक्स रिकामा होता, असं नीरजने पोलिसांना सांगितलं. सुशांतसिंह राजपूतचा १४ जून मृत्यू झाला होता. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सीबीआयने सुशांतच्या घरी जाऊन पुन्हा क्राइम सीन रि-क्रिएट केला. तर ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ-वडिलांकडे चौकशी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hzANJr