Full Width(True/False)

स्वतःच्या कामासाठी सुशांतच्या पैशांचा वापर करायची रिया, ईडीचा खुलासा

मुंबई- प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या गळ्या भोवतीचा फास आवळत चालला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय तसेच अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) केला जात आहे. रिया चक्रवर्तीच्या मोबाइल फोनचा क्लोन तयार करण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या बाबतीत PMLA (Prevention of Money Laundering Act) कलम ६६ अंतर्गत काम करत आहे. या अहवालात स्पष्ट सांगण्यात आले आहे की, रिया सुशांतचे पैसे स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी वापरत होती. रियावर करण्यात आलेल्या आरोपांचा संबंध मोठ्या षडयंत्राकडे इशारा टाइम्स नाऊला ईडीचे अधिकृत कागदपत्र सापडले आहेत, ज्यात रियावरील आरोपांचा उल्लेख केला आहे. यासोबतच ईडीने रियाचे दोन फोन क्लोन केले. या सर्व गोष्टी ईडीच्या कागदपत्रात लिहिल्या गेल्या आहेत. यावरून मोठं षडयंत्र रचण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही लोकांच्या सतत संपर्कात होती रिया या अधिकृत कागदपत्रात पीएमएलएच्या चौकशीअंतर्गत रिया चक्रवर्तीचे दोन मोबाइल फोन क्लोन केल्याचं सांगण्यात आलं आहे. या डिजिटल डेटाच्या विश्लेषणावरून व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून रिया काही लोकांच्या सतत संपर्कात असल्याचं समोर आलं. रिया , भाऊ शौविक, दिपेश सावंत, जया सहा, सायमन खंबाटा आणि गौरव आर्या यांच्याशी सर्वात जास्त बोलायची हे उघड झाले. मिरांडाच्या मदतीने रियाने घेतला होता सुशांतच्या डेबिट कार्डचा नंबर या अहवालात असंही म्हटलं की रिया आणि सॅम्युअल मिरांडा एकमेकांशी सतत संपर्कात होते. विशेष म्हणजे दोघंही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी सुशांतच्या पैशांचा वापर करायचेय एवढंच नाही तर रियाने सुशांतच्या डेबिट कार्डचा पिन नंबरही सॅम्युअल मिरांडाच्या मदतीने मिळवला होता. सुशांतच्याच पैशांचा जास्तीत जास्त वापर अभिनेत्रीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून असंही समोर आलं की रिया २०१७ पासून अनधिकृतरित्या अमली पदार्थांचा वापर आणि उपयोग करत होती. यात वीड- सीबीडी या गोष्टींचा समावेश होता. आणि सॅम्युअल मिरांडाची डील रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांनी १७ एप्रिल आणि १ मे २०२० रोजी ड्रग्जसंदर्भात चॅट केले होते. दोघंही या संबंधीच्या डिलबद्दल बोलत होत्या. या चॅटमध्ये शौविककडून वीड उपलब्ध करून घेण्याचं बोललं जात होतं. वीडच्या दोन बॅगसाठी मिरांडाने रियाकडे १७ हजार रुपयेही मागितले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lvY3dR