Full Width(True/False)

'सुशांतने आत्महत्या केली नाही त्याची हत्या करण्यात आली'

पटणा- सुशांतसिंह राजपूतच्या केसच चौकशी आता सेन्ट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन () करत आहे. सुशांतचे वडील आणि त्याच्या बहिणीने सुशांतच्या बॉलिवूडमधील संबंधांवर चर्चा केली. फरीदाबाद येथे सुशांतच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले. रिपोर्टनुसार, चौकशी दरम्यान सुशांतच्या वडिलांनी सुशांतची हत्या झाल्याचे सांगितले. कुटुंबियांनी केला हत्येचा आरोप टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या बहिणीने सीबीआयला सांगितलं की, सुशांतची केस आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी नाही तर या प्रकरणाकडे हत्येच्या दृष्टीने पाहिले पाहीजे. सुशांतच्या वडिलांनीही हत्येचा आरोप केला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं होतं. पटणामध्ये दाखल केलेल्या या केसमध्ये रियाच्या कुटुंबियांविरोधातही अनेक आरोप करण्यात आले आहेत. सुशांतच्या वडिलांनी रियावर केले गंभीर आरोप या एफआयआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करणं, मानसिक शोषण आणि त्याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची हेराफेरी यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बिहार पोलिसांची एक टीम मुंबईला गेली होती. यावेळी मुंबई पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ईडीने रिया चक्रवर्तीशी केलेल्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत. या सर्वाची सुरुवात सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्यापासून झाली. सुशांतच्या सीएनेही काही रक्कम घेतला असल्याचा आता संशय व्यक्त केला जात आहे. सुशांतच्या कंपनीचं अकाउंट सांभाळणाऱ्या दोन सीएच्या अकाउंटमध्ये मार्चमध्ये काही रक्कम गेल्याचं खुलासा रियाने ईडीच्या टीमकडे केला. २ कोटी ६५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची केली होती. मात्र सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर रिया तिचा भाऊ शौविक आणि दोन सीएच्या मदतीने त्या एफडीमधले जवळपास अडीच कोटी रुपये काढले. यानंतर एफडी फक्त २ कोटींचेच राहिले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XQY8OK