Full Width(True/False)

सॅमसंगने शाओमी आणि विवोला मागे टाकले, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सॅमसंगने जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे. सॅमसंगने या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) मध्ये इंडियन मोबाइल मार्केटमध्ये पुन्हा एकदा टॉप स्थान मिळवले आहे. म्हणजेच सॅमसंगने इंडियन मोबाइल मार्केटमध्ये चीनची कंपनी शाओमी आणि विवो यांना मागे टाकले आहे. आयडीसीच्या लेटेस्ट डेटामधून ही माहिती समोर आली आहे. इंडियन फीचर फोन प्लस स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंगची भागीदारी २४ टक्के राहिली आहे. त्यानंतर शाओमी आणि विवोची भागीदारी आहे. वाचाः स्मार्टफोन मार्केटमध्ये शाओमी नंबर वन शाओमी आणि विवो इंडियन मार्केटमध्ये केवळ स्मार्टफोनची विक्री करते. जर केवळ स्मार्टफोनवर नजर टाकल्यास शाओमी नंबर वन पोझीशनवर आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंगचे पोझीशन खूप मजबूत झाले आहे. जूनच्या संपलेल्या तिमाहीत स्मार्टफोनमध्ये सॅमसंगची भागीदारी २६.३ टक्के राहिली आहे. तर याआधीच्या तिमाहीत सॅमसंगची बाजारातील भागीदारी १५.६ टक्के होते. जून २०२० तिमाहीत शाओमी आणि विवोची बाजारातील भागीदारी अनुक्रमे २९.४ टक्के आणि १७.५ टक्के राहिली आहे. वाचाः ओप्पोच्या शिपमेंटमध्ये ५१ टक्के घट २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत शाओमीचे ओव्हरऑल शिपमेंट वर्षाच्या आधारावर ४८.७ टक्के कमी होऊन ते ५४ लाख यूनिट्सवर राहिले आहे. दुसऱ्या तिमाहीत रियलमी चौथ्या नंबरवर राहिली आहे. कंपनीने या दरम्यान १७.८ लाख डिव्हाईसच्या शीपमेंट केले आहे. रियलमीच्या शीपमेंटमध्ये ३७ टक्के घसरण झाली आहे. ओप्पोचे शीपमेंट ५१ टक्क्यांवरून घसरून ते १७.६ लाख युनिटवर आले आहे. वाचाः फीचर फोनच्या मोबाइल मार्केटमध्ये ३५.५ टक्के भागीदारी IDC च्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये ५०.६ टक्के घसरण झाली आहे. एका वर्षाआधी शीपमेंट ३.६८ कोटी युनिट होता. तो आता कमी होऊन १.८२ कोटी युनिटवर आला आहे. २०२० च्या दुसऱ्या सहा महिन्यात मार्केटमध्ये रिकव्हरीचे संकेत पाहायला मिळत आहे. दुसऱ्या तिमाहीत फीचर फोनचे शीपमेंट वर्षाच्या आधारावर ६९ टक्के कमी होऊन ते १ कोटी युनिट्सवर आले आहे. ओव्हरऑल मोबाइल मार्केटमध्ये याची भागीदारी ३५.५ टक्के राहिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kwBiG3