मुंबई: पूर्ण खबरदारी घेऊन, नियमांचं पालन करून मालिकांचं चित्रीकरण सुरू आहे. तरीही, मालिकांच्या सेटवर झाल्याचं दिसून येतंय. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेच्या सेटवर करोनाचा प्रादुर्भाव झाला असून, यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वाती चिटणीस यांच्यासह पाच जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. चिटणीस यांच्यासह मालिकेतील समीर ओंकार व सचिन त्यागी या प्रमुख कलाकारांसह चित्रीकरणातील क्रू मेंबर्सना करोनाची लागण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या सर्व कलाकारांमध्ये करोनाची कुठलीच लक्षणं आढळली नाहीत. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आणि पालिकेच्या सल्ल्यानं त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मालिकेच्या निर्मात्यांनी दिली आहे. 'साराभाई वर्सेस साराभाई', 'बा बहू और बेबी', 'खिचडी' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून दिसलेला अभिनेता राजेश कुमारलाही करोनाची लागण झालं आहे. 'मी करोना पॉझिटिव्ह असून घरातच क्वारंटाइन झालो आहे', असं त्यानं स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. राजेश कुमारला करोनाची कोणतीच लक्षणे नव्हती. मात्र चाचणी केल्यावर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. राजेश कुमार सध्या 'एक्सक्युज मी मॅडम' या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारतो आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YIKjmb