मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाला पुन्हा एकदा मोठं वळण आलं आहे. या प्रकरणात आता असे काही ठोस पुरावे सापडले आहेत जे तपासात महत्त्वपूर्ण ठरतील. हिच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे 'ड्रग्सचा कट' केल्याचा संशय अधिक तीव्र झाला. टाइम्स नाऊट्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या मृत्यूचा नारकोटिक्सशी संबंध असल्याचं वृत्त समोर येत आहे. रियाच्या चॅट्सचे काही स्क्रीनशॉट मिळाले आहेत. हेच चॅट रियाने काही दिवसांपूर्वी डिलीट केले होते. पण आता ते पुन्हा मिळवण्यात आले आहेत. रिया आणि यांच्यातलं पहिलं संभाषण मिळालेल्या व्हॉट्सअप चॅटनुसार, रिया आणि गौरव आर्य एकमेकांशी अमली पदार्थाबद्दल बोलताना दिसत आहेत. गौरवची ओळख एक ड्रग डीलर म्हणून आहे. या चॅटमध्ये लिहिले आहे की, 'जर तू हार्ड ड्रग्जबदद्ल बोलत असशील तर मी कधीही जास्त ड्रग्जचा वापर केलेला नाही.’ रियाने ८ मार्च २०१७ मध्ये गौरवला हा मेसेज पाठवला होता. रियाने गौरवला विचारले- तुझ्याकडे आहे का? दुसऱ्या चॅटमध्ये रिया आणि गौरव ड्रग्जबद्दल बोलताना दिसत आहेत. यात रिया गौरवला विचारते की, 'तुझ्याकडे MD आहे का?' MD म्हणजे MDMA. MDMA म्हणजेच मेथिलेनेडीओऑक्सीमेथेफॅटामाइन (Methylenedioxymethamphetamine) हा ड्रग्जचा एक प्रकार आहे. हे फार स्टाँग असतं. रिया आणि जया साहा यांच्यातलं संभाषण तिसऱ्या चॅटमध्ये रिया आणि जया साहा यांच्यातलं संभाषण आहे. या गप्पा २५ नोव्हेंबर २०१९ च्या आहेत. यात जया रियाला म्हणते की, ‘मी त्याला श्रुतीशी बोलून घेण्यास सांगितलं आहे.’ जया म्हणाली- आशा आहे की याने मदत होईल चौथ्या चॅटमध्ये रिया म्हणाली की, ‘खूप खूप धन्यवाद.’ प्रत्युत्तरात जया म्हणाली की, ‘काही हरकत नाही, आशा आहे की याने मदत होईल.’ जया म्हणाली- परिणाम पाहण्यासाठी प्रतीक्षा कर पाचवं चॅटही २५ नोव्हेंबर २०१९ चं आहे. यात जया रिया चक्रवर्तीला म्हणते की, 'चहा, कॉफी किंवा पाण्यात 4 थेंब घाल आणि त्याला प्यायला दे. परिणाम दिसण्यासाठी ३० ते ४० मिनिटं थांबा.' म्हणाला – सामान संपत आलंय त्यानंतर मिरांडा आणि रिया यांच्यात काही वेळ संभाषण झालं. यात मिरांडा रियाला म्हणाला की, 'हाय रिया, सामान जवळजवळ संपलं आहे.' या गप्पा एप्रिल २०२० च्या आहेत. मिरांडाने विचारले- मी शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का? दुसर्या गप्पांमध्ये मिरांडा रियाला विचारतो की, ‘आम्ही शौविकच्या मित्राकडून हे घेऊ शकतो का?’ पण त्याच्याकडे फक्त hash आणि bud आहे. ' इथे hash आणि bud या ड्रग्जना कमी दर्जाचं मानलं जात आहे. या गप्पाही एप्रिल २०२० च्या आहेत. गौरव आर्याने दिला नकार त्याचवेळी जेव्हा गौरव आर्याला यासंबंधी विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, 'मी ड्रग्ज घेत नाही. जे दावे केले जात आहेत त्याविषयी मला माहीत नाही. ' तर दुसरीकडे रिया चक्रवर्तीच्या वकिलांचीही यावर प्रतिक्रिया आली आहे. त्यांच्यामते, रियाने कधीही ड्रग्ज घेतले नाहीत. ती रक्ताच्या चाचणीसाठीही तयार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QrmlqY