मुंबई: अभिनेता याच्या मृत्यूचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तसंच मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडी मार्फतही हिची चौकशी सुरू आहे. असं असताना तिचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स देखील आता समोर आले आहेत. रियाच्या या कॉल रेकॉर्ड डिटेल्समधून अनेक गोष्टींचा उलघडा होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांपैकी एक व्यक्ती रियाला मदत करत असल्याचं म्हटलं जात होतं. या कॉल रेकॉर्ड डिटेल्समध्ये एका अधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे. बिहार पोलिस दलातील डीजीपी गुप्तेश्वर पांड्ये यांनी मुंबई पोलिसांपैकी एकजण रियाला मदत करत असल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. रियाच्या कॉल रेकॉर्ड डिटेल्समध्ये डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचं नावं आलं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रियानं चार वेळा फोन द्वारे संपर्क केला होता. तर एक एसएमएस पाठवण्यात आला होता. रियाच्या कॉल रेकॉर्ड डिटेल्समधू आणखी एक माहिती उघड झाली आहे, ती म्हणजे सुशांतपेक्षा जास्त तिनं सुशांतच्या एक्स मॅनेजरला कॉल केले होते. श्रुती मोदी ही सुशांतची बिझनेस मॅनेजर म्हणून काम पाहत होती. रियानं श्रुतीला तब्बल ८०८ कॉल केले होते. तर सुशांतला केवळ १४७ कॉल रियाकडून करण्यात आले होते. तसंच रिया महेश भट्ट यांच्या संपर्कात देखील होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XD2kSp